मराठा तेली समाज हळदीकुंकू समारंभ

     मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २५/०१/२०२० जयभारत मंगलम अमरावती येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ.शुभांगीताई शिंदे , सौ.राजश्रीताई बोरखडे, सौ.मिनाताई गिरमकर, सौ.विजया बाखडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजाचे आराध्य दैवत सतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे महीला मंडळ द्वारे पुजन करण्यात आले.

Maratha Teli Samaj haldi kunku samarambh 2020     भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत मराठा तेली समाजातील महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाऱ्या हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक असले पाहीजे असा मानस ठेवुन त्यांनी या वर्षी संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूं म्हणजेच पिशवी,  याच पर्यावरणपूरक मोहिमेचा समावेश तेली समाजातील महिलांनी सामूहिक हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून पर्यावरणपूरक वस्तू देण्याचे पाऊल उचलले आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कापडी पिशव्यांमध्ये प्रचंड वैविध्य आले आहे. छोटी घडी होणाऱ्या पिशव्यांना पसंती देत संक्रातीच्या वाण संस्कृतीला पर्यावरणपूरक टच दिला आहे. अशा वस्तूंची देवाणघेवाण महिला मराठा तेली समाज विकास मडंळ अमरावती संक्रातीच्या निमित्ताने इकोफ्रेंडली गोडवा साजरा केलेला आहे.

     आपला समाज हाच आपला परीवार अशी भावना ठेऊन आपल्या या पारीवारीक कार्यक्रमला महीलांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नतंर लगेच मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरीता महीलासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, उखाने स्पर्धा ,डिश डेकोरेशन, मॕचिंग ड्रेस ,एक मिनीट शो आणि लहान मुला-मुलींन साठी बलुन पाॕप्स गेम्स ,थ्रो बॉल, सर्वच स्पर्धेत उपस्थित महीलांनी व युवतींनी सहभागी होऊन कार्यक्रमचा आनंद घेतला. यामध्ये डिश डेकोरेशन स्पर्धेत स्मिता काळे व संध्या शिरभाते,तसेच मॕचिंग स्पर्धेत आरती मेहरे, संध्या शिरभाते ,व मुलीमध्ये नेहा बाखडे ,कनिष्का बाखडे ,श्रेया बोके, रांगोळी स्पर्धेत निशा अंबुलकर आणि छोट्या मुलानमध्ये बलुन पाॕप्स यामध्ये आरुषी डिवरे व स्वराज मेहरे, व थ्रो बॉल या स्पर्धेत आयुष कोराट व पार्थ बाखडे विजेते झाले.विजेते स्पर्धकाला मान्यवंराचे हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

     उपस्थित सर्व समाज बांधवाचा परीचय व्हावा , भेटी-गाठी व्हाव्या या नात्याने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाने केले आहे.

     या कार्यक्रमाचे आयोजन मडंळाचे अध्यक्ष मा.श्री.चद्रकांत मेहरे यांनी केले, ,कार्यक्रम यशस्वी ते साठी सौ.पल्लवी मेहरे,सिमा लोंखडे,हेमा डवरे, वर्षा बाखडे , प्रतिमा काळे, प्रिती श्रीरसागर ,लिना बोके,सिमा बाखडे, शालीनी माहुरे, भाग्यश्री माहुरे, प्रिया तिरथकर, अलका व्यवहारे, शिला मांगलेकर,चतुर ताई , लता तिडके, योगीणी काळे,योगीता रायकर, रीना माहुलकर, रुपाली ताकपीरे, आरती मेहरे, प्रतिक्षा खेडकर , प्राजक्ता सरोदे ,स्नेहल गिरमकर ,कु.धनश्री मेहरे ,कु.राधीका मेहरे ,कु.श्रेया बोके,कु.नेहा बाखडे यांनी विशेष प्रयत्न केले.

     प्रा.स्वप्निल वि.खेडकर  संचालक  मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती  ९१५८५८७२३०
 

दिनांक 02-02-2020 12:28:38
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in