जातीनिहाय जनगणना गरजेची तेली समाजाने सरकारकडे केली आग्रही मागणी

    नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली.

     तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले. यावेळी संजय नरखेडकर, प्रा. डॉ. नामदेव हटवार, संजय भलमे, धनराज तळवेकर, रमेश गिरडकर, राजेद्र डकरे, माणिकराव सालनकर, आनंद नासरे, गोविंद किरपाने, संजय रेवतकर, नरेश चोपकर, अनुज हुलके, अनिल धुसे, संजय वाडीभस्मे, रमेश मदनकर, ज्ञानेश्वर लांजेवार,मीनाक्षी तलमले. प्रांजली नरखेडकर,शोभा नासरे, वंदा शेडे, संजय शेंडे आदी यावेळी उपस्थित होते.

    देशातील आकडेवारी बधता तेली समाज १३ टक्के, राज्यात १३ टक्के आणि विदर्भात १९ टक्के असल्याचे समाजबांधव सांगतात. तेली समाजाने वेळोवेळी आपल्या हक्कांसाठी ला दिला. विदर्भ तेली समाजाने केलेल्या आंदोलनाचे फलित म्हणून ओबीसीना शिष्यवृत्ती सुरू झाले. याचा लाभ ओबीसीमध्ये येणाऱ्या सर्व समाजाला झाल्याचे समाधान तेली समाजबांधवांनी व्यक्त केले.  

घाणीतून तेल काढणारे तेली

Teli Samaj Wants caste wise census     तेल काढणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय, सातवाहन काळात, गुप्त काळात श्रेणी म्हणून तेली समाजाच्या संघटनाही अस्तित्वात होत्या. या संघटनांच्या माध्यमातून निधी गोळा करून समाजकार्यासाठी पुढाकार घेतला जात होता. बैल फिरत होते आणि घाणीतून तेल काढले जात होते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तेली बांधवांनी तेल काढण्याचा व्यवसाय तेल काढण्याच्या किंवा आपल्या कामाच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार तेली समाजात पोटशाखा तयार झाल्या. ओबीसीमधील जातींची यादी बघितली तर १८१व्या क्रमांकावर तेली समाज आहे. १९९८ मध्ये मागासवर्गीय आयोगाला सादर झालेल्या सूचित तेली समाजातील पोटशाखांचा उल्लेख करण्यात आला होता. मूळ तेल काढण्याचा व्यवसाय करणारे तेली म्हणून ओळखले जात असले तरी आज  समाज आपल्या पारंपरिक व्यवसायापासून दूर गेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत हा समाज आज कार्यरत आहे. शिक्षण, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, राजकारणी, कृषी, सरकारी कर्मचारी, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात समाजबांधव आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वाने तेली समाजबांधवांनी या विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

अशा तयार झाल्या पोटशाखा

     एका बैलाच्या माध्यमातून तेल काढणाऱ्यांना एकबैल तेली, दोन बैलांच्या साहाय्याने तेल काढणाऱ्या समाजाला दोन बैल तेली असे म्हटले जात होते. तिळाचे तेल काढणाऱ्याला तिळवण आणि एरंडीचे तेल काढणाऱ्याला एरंडेल तेली म्हणुन ओळख होती. मुस्लिम तेलीही आहेत. हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्माचे उत्सव हे तेली साजरे करतात. छत्तीसगडया भागातील तेली यांना झिरया, साहुतेली असे म्हटले जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागात तेली समाजाच्या पोटशाखा आढळून येतात. यात पंचम किंवा लिंगायत तेली, कानडे, लाड, गुजर, आचार, कडू किंवा अक्करमासे, कंडी, शनिवार, शुक्रवार, राठोड तेली, परदेशी तेली, तिळवण, मराठा तेली, देशकर, अत्रीय तेली, एरंडल तेली, बाथरी तेली, लिंगायत तेली, दोन बैले, तराणे, साव तेली, सावजी, साह तेली, हिलया तेली, झारिया तेली, चौधरी यांचा समावेश आहे.

समाजभवनामुळे मिळाले बळ

     तेली समाजाचे चार समाजभवन आहेत. सिव्हिल लाइन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह, सोमवारी पेठ येथील तेली समाज सभा, सोमवारी क्वार्टर, बगडगंज येथे प्रत्येकी एक असे समाजभवन आहेत. रामटेक येथे समाजाची धर्मशाळा आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर समाजाचे सभागृह आहे. या समाजभवनामुळे तेली समाजाला अधिक बळ मिळाले. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे समाजभवन महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे.

     तेली समाजाचे बळ अधिक असले तरी समाजापुढे अनेक समस्या आहेत. आपल्या हक्कासाठी तेली समाजबांधवांचा लढा सुरू आहे.

    शिक्षण घेऊनही समाजातील युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार मिळावा यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.

     शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी समाज बांधवांनी आवाज उठविला आहे. गरजूना शिक्षण मिळावे अशी व्यवस्था हवी.

    आरोग्य आणि शिक्षण मोफत देण्यात यावे. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबी देण्याची जबाबदारी शासनाचीच आहे.

    शिक्षणाचे सुरू असलेले खासगीकरण थांबविण्यात यावे.

   शेतकऱ्यांना अनुदान देऊन कृषी विभागाने शेती करण सोईचे ठरेल असे वातावरण निर्माण करावे.

   लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे.

   शासनाने युवा धोरण ठरवून समाजातील युवकांसाठी सशक्त वातावरण निर्माण करावे.

   भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शेती धोरण राबविण्यात यावे. शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी.

. समाजातील अनेक कलावंत आजही वंचिताचे जीवन जगत आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. 

   जिल्हा तालुकापातळीवर वसतिगृह तयार करण्यात यावे.

  ओबीसीचे आरक्षण देताना क्रिमिलेअरची अट रद करावी.

   जात प्रमाणपत्र मिळण्याची पद्धती सोपी करावी.

   तेली समाजाच्या विकासासाठी संताजी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.

विदर्भ तेली समाज महासंघ 

केंद्रीय अध्यक्ष : रधुनाथ शेंडे, सरचिटणीस : प्रा. नामदेव हटवार. अध्यक्ष: संजय शेंडे. कार्याध्यक्ष : संजय नरखेडकर - सचिव : संजय सोनटक्के.कोषाध्यक्ष : धनराज तळवेकर . उपाध्यक्ष : अनुज हलके, संजय भलमे, सुरेश वंजारी, ऋषी कुल्लरकर, अरुण आष्टनकर, इंद्रपालजी जाळकर, जानकी सेलूकर, वंदना बनकर . सहसचिव : राजेंद्र डकरे, अनिल धसे. गोबिंद किरपाने, रमेश उमाटे, आनंद नासरे, सुभाष कळंबे, प्रेमानंद हटवार . संघटक: संजय वाडीभस्मे, शंकर उबाले, प्रशांत मदनकर, राजेंद्र डफ, दिनकर गायधने, मानिक सालनकर, राजेश तळवेकर कार्यकारणी सदस्य : मोहन आगासे, पांडुरंग झाडे, अशोक बालपांडे, चिंतामण धावडे, प्रवीण जुमडे, बाबुराव भुते, ज्ञानेश्वर लांजेवार - महिला प्रतिनिधी : माया वाघमारे, दुगाँ बाभुळकर, वृंदा शेडे, प्रांजली नरखेडकर, अर्चना आष्टनकर, अल्का वंजारी, संगीता आकरे, प्रवीणा बालपांडे,शोभा नासरे. मार्गदर्शक : विजय बाभुळकर, रमेश गिरडकर, अॅड.सुभाष काळबांडे, शेखर गुल्हाने, डॉ. चंद्रकांत मैहर, अॅड. पुरुषोत्तम धाटोळे, रेवानाथ कुरस्कर, शशांक वाठ, पुरुषोत्तम थोटे, एन. एल. सावरकर, पंडित नागपुरे

संघटनात्मक जाळे -  विदर्भ तेली समाज महासंघ. तेली समाज सभा - श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा. संताजी सेवा मंडळ. तेली समाज सामूहिक विवाह समिती. संताजी समाज परिषद - पश्चिम नागपूर तेली समाज. जवाहर विद्यार्थी गृह

सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य

     तेली समाजबांधवांच्यावतीने संताजी महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ६ ऑक्टोबर रोजी डॉ. मेघनाद साहा यांची जयंती साजरी केली जात असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेतले जातात. विधवा, विधुर, दिव्यांगांचे परिचय मेळावेही भरविले जातात. विदर्भ तेल महासंधाचे संस्थापक असलेले दिवंगत मधुकर वाघमारे यांच्या संकल्पनेतून परिचय मेळाव्यांना सुरुवात झाली. शेकडो लोकांना या परिचय मेळाव्याला लाभ झाला असून त्यांनी आपले संसार नव्याने थाटले असल्याचे समाधान समाजबांधवांनी व्यक्त केले. सामूहिक विवाह सोहळे भरविले जातात. स्पर्धा परीक्षांसाठी विद्याथ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी विशेष शिबिर घेण्यात येतात. समाज प्रबोधनासाठी अभियान, समाजपरिवर्तन, समाजक्रांती असे मासिक काढण्यात आले. अभियान मासिकाच्या माध्यमातून आज समाजाचे विविध उपक्रम समाजबांधवांपर्यंत पोहोचविले जातेत. रोजगार हक्क परिषदेचे आयोजन केले जाते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण करण्यात आले होते. संताजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवरही उत्साहात साजरी केली जाते.

दिनांक 21-03-2020 04:42:07
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in