कोथरूडमध्ये श्री संताजी भवनाचे उद्घाटन

      कोथरूड, दि. १ - मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या श्री संताजी प्रतिष्ठानला हक्काची जागा मिळाली आणि कोथरूड परिसरात प्रतिष्ठानची इमारत उभी राहिली. त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते पृथ्वीराज सुतार यांची साथ मिळाली. त्यामुळे सुतार यांच्या हस्ते श्री संताजी भवन या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.

     यावेळी डॉ. राजेंद्र मीटकर, संगीता अभिजित पन्हाळे, सुभाष चव्हाण, तात्या वांबिरे, नारायणराव शिंदे, ॲड. गोरख किरवे, सिने अभिनेते दत्तात्रय उबाळे, शहर तेली समाजाचे अध्यक्ष घनशाम वाळुजकर यांच्यासह विश्वस्त मंडळ आणि उपनगरांतील सर्व संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. संस्थेच्या वतीने समाजउपयोगी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मोफत वधू-वर मेळावा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, आरोग्य शिबिर, महिला दिन, हळदी-कुंक, फंडाच्या माध्यमातून गरजू समाज बांधवांना अर्थिक मदत, कौटुंबिक सहली यांचे आयोजन केले जाते. मात्र, जागेअभावी कार्यक्रमांना अडचणी येत. त्यावर सुतार यांच्या माध्यमातून संस्थेला हक्काची जागा खरेदी करता आली. दरम्यान, मेट्रो उड्डाणपुलाला श्री संताजी महाराज जगनाडे पूल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी यावेळी समाजबांधवाकडून करण्यात आली.

Kothrud Teli Samaj Santaji Bhawan Udghatan     संताजी भवन ही वास्तू इतर समाज बांधवांसाठी खुली असल्याचे संघटनेचे खजिनदार सूर्यकांत मेढेकर यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब अंबिके, विजयकुमार शिंदे, संजय भगत, संतोष माकुडे, रोहिदास उबाळे, प्रदीप क्षिरसागर, तानाजी विभुते, विजय रत्नपारखी, प्रकाश करडिले, विलास रत्नपारखी, गणेश पिंगळे, रोहिदास हाडके, महेश किर्वे, दिलीप चव्हाण, सुरेंद्र शिंदे, माऊली व्हावळ, सुधीर वालुंजकर, नाना चिलेकर, पी. टी. चौधरी, निशा कर्पे, राजेश्वरी चिंचकर आदी उपस्थित होते.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत मेढेकर, राजु किर्वे, किरण किर्वे, प्रकाश देशमाने, विठ्ठलराव किर्वे, भगवान खंदारे, रविंद्र उबाळे, लक्ष्मण कावडे, महेंद्र शेलार, श्रीधर भोज, रामचंद्र कटके, तुषार वाचकवडे, विजय भोज, वासुदेव गुलवाडे, संकेत भोज, स्वप्नील किर्वे, पंडीत चौधरी, संतोष किर्वे, रत्नाकर दळवी, दिलीप शिंदे, अनिल घाटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोथरूड येथील संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश भोज तर डॉ. राजेंद्र मिटकर यांनी आभर मानले, असे आयोजकांनी सांगितले.

दिनांक 04-01-2021 13:51:20
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in