घोडनदीचा प्रसन्न किनारा लाभलेल्या, श्री रामलिंग महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर सारख्या पुण्यभुमीत 1935 साली एका सामान्य परंतु कष्टाळु, प्रामाणिक, परोपकारी कुटुंबात किसनराव शंकरराव शेजवळ यांचा जन्म झाला.
घरच्या हलाखीच्या परिस्थिती मुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पाच भावांच्या एकत्रित कुटुंबात किसनराव सततच्या कष्टाने, जिद्दीने पुढे जात होते.
त्यांचा विविह कडुस ता. पारनेर, जि. अ. नगर येथील श्री. भाऊसाहेब लक्ष्मण काळे यांच्या शेतकरी कुटुंबातील मुलगी सौ. बबई हिच्याशी झाला.
कुटुंब स्थिरस्थावर करण्यासाठी व चरितार्थासाठी किसनराव शेजवळ यांनी हातगाडी वरून रॉकेल विकायचा व्यवसाय केला. हातावरचा व्यवसाय, प्रतिकुल परिस्थिती आणि मोठे कुटुंब असे अस्थिर वातावरण असतानाही कुटुंबात पंरपरा पिढीजात असलेली पैलवानकीची परंपरा ही त्यांनी जपली. स्वत: पैलवान होताना धकट्या भावांनाही पैलवान बनविले. समाजातील लोक यांना आप्पा म्हणुन ओळखत असे.
पत्नी व मुलांच्या रूपाने कुटुंबाची वेली वाढत असतानाच आप्पांनी रॉकेल विक्रीच्या व्यवसायाबरोबर मालट्रक वर क्लिनर म्हणुन काम केले. त्यावेळी पडेल ती कष्टाची कामेही करावी लागली. क्लिनर म्हणुन काम करत असताना वाहन चालविण्याची कला आत्मसाथ केली. पुढे एस.टी. चालक म्हणुन नोकरी मिळाली आणि रडत-खडत चाललेली कौटुंबिक गाडी काहीशी रूळावर आली.
या नोकरीच्या माध्यमांतुन कुटुंबाला पुढे नेताना पै पै जोडुन आप्पांनी काटकसर करीत पैसे साठविले आणि त्यातुन तेलघाणीचा परंपरागत व्यवसाय सुरू केला. पत्नीची मनापासुनची साथ, मुलांची दमदार साथ या बळावर त्यांनी तेलघाणीच्या व्यवसायात चांगला जम बसवला.
एस.टीच्या नोकरीत निवृत्ती पत्करलयानंतर व कुटुंब स्थिरस्थावर झाले असताना आप्पांनी सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेऊन समाज बांधवांच्या कल्याणास्तव शिरूर तिळवण तेली समाज संघटनेच्या माध्यमातुन सामाजिक कामात सहभाग घेतला.
पुढे तिळवण तेली समाज अध्यक्ष पद भुषविण्याची संधी त्याना मिळाली. या पदाच्या माध्यमातुन त्यांनी समाज कल्यानास्तव अनेक उपक्रम राबविले. समाजोद्धाराची अनेक कामे करताना धार्मिक उपक्रम, हनुमान जयंती, मुंबई बाजार येथील समाजाचे हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जीवनाच्या अखेरच्या टप्यात ते अंत्यंत समाधानी होते. या समाधानातच त्यांनी ईहलोकाचा निरोप घेतला व अनंताच्या वाटेला निघुन गेले.
सर्व समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धाजंली.