श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा कालचा आजचा आणि उद्याच.

    संत शिरोमणीतुकाराम महााजांच्या अगोदर पासून चालु असलेली पंढरपूरी वारी सर्व भगवतभक्त वारकर्‍यांना दरवर्षी या आनंद सागरात यथेच्छ आनंदाने भक्ती रसात डुंबायला मिळते. वारीसाठी तो वयाचा विचार न करता त्यात तन मन धन अर्पुण सामिल होतो. चातका प्रमाण तिची वाट पहातो. त्या वारीचा आनंद काही वेगळाच असतो.

हेचि व्हावी माझी आसा ॥
वारी चुको नेदी हरी ॥

    संत ज्ञानेश्‍वर व संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर जाणार्‍या आमच्या समाज बांधवांना श्री संत संताजी महााजांचीही पालखी सोहळा असावा अशी मनामन तळमळ होती. कै. धोंडीबा राऊत, कै. रत्नाकर दादा भगत, कै. शरद देशमाने, क. रावसाहेब पन्हाळे व कै. अर्जुनशेठ बरडकर यांच्य निश्‍चयातुन 1978 साली सोहळा सुरू झला. पुणे परिसरातील अनेक महाराजांवर श्रद्धा असणार्‍य भक्त मंडळींनी आप आपल्या परीने पालखी सोहळा वृध्दींगत होण्यासाठी हातभार लावलेला आहे. 

    बर्फाच्या गाडीवर निघणारा तो पालखी सोहळा व त्यात सामिल झालले वैष्णवजन एका ध्येयाने प्रेरीत झालेले होते. उन, वारा, पाऊसात पिण्याचे पाणी व मुक्कामासाठी निवारा मिळवण्यात किती तरी त्रास पडूनही. आहे त्यात समाधान मानून वेळ प्रसंगी चिखलात व दगडधोंड्यात वारकर्‍यांनी मुक्काम केलेला आहे. मोजक्यच. 30 ते 40 लोकांसह सुरु झालेला हा सोहळा आता खर्‍या अर्थाने सुस्थीतीत व सुरक्षीतपणे भव्य स्वरूपात मार्गस्थ होत आहे.

    माझी आई कै. सुभद्रा रामचंद्र रत्नपारखी 1976 पसुन पायी वारी करत होती. 1980 पासून ती संताजी महाराजांचे पालखी सोहळ्यां बरोबर वारी करू लागली, पुढे माझे वडील कै. श्री. रामचंद्र महादेव रत्नपारखी (बाबा) 1982 पासुन सोहळ्यात सामिल झाले. त्यांच्या आठवणीचा ठेवा मला या मार्गाकडे खेचुन आणण्यास कारणीभुत ठरलेला आहे. त्यांनी याकाळात वारी पुर्ण करण्याला प्राधान्य दिले., सर्व च्या अडचणीवर मात केली श्री. अंबिके, श्री फल्ले, श्री. मेरूकर, राऊत आजी, श्री. शिंदे, उबाळे, देवराय,  जगनाडे, पिंगळे या जेष्ठ पदाधिकार्‍यांनी एकमेकाला सहकार्य करून अडचणीवर मात केली. याच पदाधिकार्‍यांच्या काळत चांदीची पालखी रथ चांदीचा पालखी चांदीच्या पादूका पंढरपूर येथे जागा घेऊन मंदिर व खोल्या बांधल्या गेल्या आहेत.

    श्री. सुर्यकंत क्षिरसागर, ह.भ.प. श्री. जगन्नाथ दहितुले, ह.भ.प. जगन्नाथ काळे, ह.भ.प श्री. बाळकृष्ण कर्पे, ह.भ.प. श्रीकृष्ण चवार, ह.भ.प. रामेश्‍वर साखरे, ह.भ.प. गणेश आवजी या सर्व महानुभावांनी आपआपल्या दिंड्या काढून सोहळा मोठा केला आहे. 
    गेल्या 40 वर्षापासुन श्रीमती वनारसी राऊत व त्यों कुटुंबीयांनी पालखी साहळ्यांसाठी आपले आयुष्यातील मोलाचे दिवस व महिने दिलेले आहेत. श्री. अरूण काळे, श्री. नारायण क्षिरसागर, अनिल राऊत, दत्तात्रय धेत्रे, बाळु काळे, श्री. आत्माराम बारमुख, श्री. नामदेव तेली, श्री. कोंडीबा दिवकेर यांच्या पश्रिश्रमाने आजचा सोहळा मोठा झालेला पहायला मिळतो आहे. वर्षानुवर्षे वारी करणारे चोविे, वालझाडे, सिताराम कहाणे, ह.भ.प. बाळकृष्ण वाळुंजकर, अंबिके डोंगरे, किर्वे, साखरे, कहाणे, घाटकर, शिंदे या सर्वांमुळे सोहळ्यांला आधार मिळुन सोहळ्याचे महत्व वाढिस लागले आहे. 

    श्री. पोपटराव पिंगळे सारख्याच असंख्य दानशुर कुटुंबीयांनी पालखी सोहळ्यास लाखो रूपयांची मत करून. सोहळ्यांसाठी आवश्यक गोष्टीची पुर्तता केलेली आहे. गेल्या पाच वर्षा पासुन माझा पालखी सोहळ्यांशी स्नेह जुळला माझ्यातला सेवकेरी, वारकरी बनुन वारीत सहभागी झाला. माझ्या आई वडिलांचा आर्शिवाद व त्यांची पुण्याई मला या मार्गाला घेऊन आली. वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर व पंढरपुरी विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर जे अत्मीक समाधान लाभते त्याच्याच जिवावर वर्षभर वारीमुळ आध्यात्मिक उर्जा मिळुन मानसिक स्थिरता लाभते.

    पंढरीची वारी आहे माझे घरी ॥
    आणिक न करी तीर्थव्रत ॥

    आज गेल्या चा वर्षातील अनुभवांचा मागोवा घेतल्यावर मनास भावतातते बैलजोडी देणारे समाज बांधव, स्वर्गीय ज्ञानोबा भगत, व त्यांची मुले निबड्याचे श्री. चंद्रकांत कर्पे व कुटुंबीय, मोईचे गारे पाटील बंधु व त्यांचा मित्र परीवार, महाराजावरील भक्तीपोटी आपल सर्व कामाचे दिवस पालखी सोहळ्यांसाठी अर्पण करणारे हे सर्व भगवतभक्त आणि सोहळ्यात सामिल झालेले. ओरंगाबाद, बीड, नागपुर, जालना, नगर, पुणे, रायगड, मुंबई, नाशिक , सातारा, सांगली जिल्ह्यातील वैष्णव जन,. या सर्वांना बरोबरघेऊन, त्यांच्या अडीअडचीचीसोडवणुक करणारी आजची सोहळा समिती त्यांच्या हाकेला ओ !  देऊन मार्गावरील गावोगावच्या मुक्कामाचे यजमान व त्यांचे महाराजांवरील  प्रेम व श्रद्धा पाहुन मन भरून येते.

    आजच्या परिस्थीती मध्ये अनेक ठिकाणी मुक्कामा साठी अजुनही व्यवस्थीत जागा मिळणे अवघड झालेले आहे. जेवणांसाठी रात्री 10 ते 11 वाजतात. पिण्याचे पाण्यासाठी व आंधोळीसाठी पाण्याची कमतरता जाणवते आहे. स्वयंपाक व त्याचे साठी सेवा देणार्‍या महिलांची व्यवस्था करणे अशक्य होत आहे. काही स्वंसेवा देणार्‍या महीला व पुरषांमुळेच भोजनाची तयारी, वाढण्यासाठी मदत मिळत आहे. मुक्कामाचे ठिकाणी किर्तनासाठी व जेवणांसाठी जागेच्या अडचणी आहेत. 

पालखी सोहळा उद्याला कसा असावा.

    मनात अनेक प्रश्‍नांचे विचार सतत घोळत राहतात. आणि मग सर्वात पहिला विचार येतो तो महाराजांचे पालखी रथाचा, आताचा रथ, वर्षानुवर्षे दुरस्त करून दरवर्षी मार्गस्थ होतो. केंव्हा तरी तो माऊलींच्या रथा सारखा बनवयला हवा. बैलांना कमी श्रम पडणारा, तीन कळस असलेला. कमी वजनाचा पण भक्कम, देखणा रथ असावा ही भावना सर्व समाज बांधवाची आहे. म्हणुनच पुढील वर्षी नविन रथ बनविण्याचे कार्य महाराजांच्या आशिर्वादाने सुरू करणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील समाज बांधवाना भेटुन मदत गोळा करण्याचे ठरविले आहे.

    पिण्याचे पाण्यासाठी पाण्याचा स्वतंत्र टँकर आहे. परंतू त्याची क्षमता कमी आहे. त्यात वाढ करणे अगर नवीन टँकर मिळविणे साठी प्रयत्न केले जाणार आहेत जेष्ठ व वृद्ध वारकर्‍यांसाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्याचा मानस आहे. सर्वांसाठी वारी सुलभ व्हावी म्हणुन अ‍ॅम्ब्युलन्स व्यवस्था असावी ही भावना मनात ठेऊन प्रयत्न चालु आहेत. स्वत:चा मोठा जनरेटर घेऊन विजेची व्यवस्था करण्यासाठी सहकार्याची आपेक्षा आहे. 

    पंढरपुर येथे मंदिर परिसरात सुसज्ज भक्तनिवास बांधुन वर्षभरात केव्हा ही येणार्‍या भक्तांसाठी भोजन व राहण्याची व्यवस्था होईल या दृष्टने सहमतीने सन्मार्गाने मदत मिळविण्यासाठी मंडल कार्यरत आहे. व महाराजांचे पंढरपुरच्या मंदरी परीसरचा विकास व्हावा व महाराजांचे पंढरपूरच्या मंदीर परीसराचा आनंद मिळावा ही अपेक्षा आहे. भक्तांना तेथे जाण्याने आनंद मिळावा ही अपेक्षा आहे. आपणा सर्वांचे हजारो हात एकत्र आले तर सोहळा मोठा होण्यास अडचण नाही. 

दिनांक 01-07-2016 20:33:40
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in