तिळवण तेली समाजातील कार्यकर्त्यानी श्री. संजय रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली वधु - वर पालक परीचय मेळावा दि. २२ मे २०१४ रोजी गणेश कला क्रिडा मंच स्वारगेट पुणे येथे भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमांस अध्यक्षपद सौ. राजश्रीताई भगत यांनी भुषवले कार्यक्रमास माथाडी कामगाराचे नेते चंदर मौर्य श्री. रोहीत कर्पे, श्री. अभिजित पन्हाळे नगरसेवक दिनेश धावडे नगर सेवक अप्पा हरीहर, नगरसेवक दिनेशा धावडे नगर सेवक उयकांत आंदेकर व सातारा समाजाचे अध्यक्ष जयसींगराव दळवी पनवेल, परभणी, जळगावव, धुळे, नगर, नाशिाक, जालना, नागपुरू, नंदुरबार येथुन समाजाचे प्रतिष्ठीत नेते आले होते.
आज पर्यंत महाराष्ट्रात असंख्य मेळावे झाले पण असा मेळावा कधी ही कोठे ही झाला नाही मेळाव्याला जे समाज बांधव आले त्यांनी मनापासुन मेळाव्याच्या कार्यकर्त्याना वाहवा म्हणुन शबासकी दिली मेळाव्याचे स्टेजचे नियोजन हे सुदर भव्य व दिव्य असेच होते ते पहाताच ज्यांनी पाहीले त्याने खरोखरच चांगले वर्णन केले ते कैतुकास्पद होते. तेली समाजाची सुवर्ण कन्या पुजा घाटकर हिच्या हस्ते वधु वरांचा सत्कार करण्यात आला.
हा मेळावा भव्य दिव्य व नियोजन पद्धतीने आयोजीत करून कार्यकर्त्यानी एक वेगळा पायडा पाडला कारण हा सर्व कार्यक्रम कार्यकर्त्यानी पार पाडला कोठे ही गालबोट लागु नये ह्याची सुद्धा काळजी घेतली म्हणून सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा आभार
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade