गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.
विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
ccccc
पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे. पारंपारिक लाकडी घान्शाला बैल जुंपून तेल गाळण्याचे काम करतात. विशेष म्हणजे आज तेल गाळण्याच्या आधुनिक गिरणी उपलबद्ध असताना काही हौशी शेतकरी या घाण्यावर तेल काढून घेतात.
त्याकाळी अनेक भागात तेल घाणे सुरू होते. परंतु बदलत्या तंत्रज्ञाना बराबर या तेल घाण्याची जागा मशिनरींनी घेतली. अनेक घाणे हळूहळू कालबाह्य झाले. परंतु गिरकर यांनी आजोबांपासून सुरू असलेल्या तेलाचा लाकडी घाणा अजुनही सुरू ठेवला आहे. एका बाजुला बैललाला बांधून हा बैल गोल फिरून लाकडी ीां÷यातील असलेले खोबरे दांड्याच्या साह्याने दाबले जाते. या भाडंयाच्या खाली असलेल्या दीद्रा मधून हळू हळू तेल बाहेर पडते या त्याच्या कामाला त्यांना 85 वर्षाची आते नकुबाई गिरकर ही मदत करते. या वयात देखील पळाईने घाण्याच्या भां÷यावर बसून खोबरे भरण्याचे काम त्या करतात.
तेल काढून घेण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक लोक त्यांच्याकडे येतात. एका दिवसात साधारण 5 लिटर तेल काढले जाते. डिंसेबर ते मे या काळात त्यांचा हा व्यवसाय चालतो. याच व्यवसायावर त्यांचा चरितार्थ चालतो. सात जणांचे हे कुटुंब आसून मुले अन्य शेतीची कामे करतात . या तेलामध्ये कोणतेही मिलावट नसल्याने अतिशय शुद्ध असे खोबरेल तेल. मिळते. याच बरोबर पेंड देखील मिळत असून त्याचा वापर हा गुरांसाठी करता येतो.