पुणे :- पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ही सत्ता मिळविण्यासाठी मराठावादी काँग्रेसने बोगस ओबीसी निवडून आणले होते. मराठा समाजाच्या दडपशाहीला कंटाळलेल्या ओबीसींनी मोदींच्या बेगडी ओबीसीला मत दिले मुळात त्यांच्या विकासाला मत दिले होते. तळागाळात विकास होणार होता. यातुन जन्माने ब्राह्मण असलेले श्री. दवेंद्र फडणवीस मुळात ओबीसी मतावर सत्तेत गेले. पण यांनी सत्तेत जाऊन जे केले ते आता पहा. इतर मागास आयोगावर भ्रष्ट्रचारी व मराठा अभ्यास गटाचा संभाजी म्हसे बसविला. आणि आता मनपा निवडणूकी मध्य मराठा म्हणून जन्मलेले व पैशाावर ओबीसी झालेले आहेत. हाती आलेले निकाल फक्त मी मांडत आहेत.
पुणे मनपाचे काही बोगस ओबीसी
1) कळस 2) विमाननगर 3) खराडी 4) वडगाव शेरी, 5) बावधन कोथरूड, 6) रामबाग कॉलनी, 7) खडकमाळ आळी 8) मुंढवा 9) वारजे 10) वडगाव धायरी 11) सन सिटी 12) मार्केट यार्ड 13) अप्पर - इंदिरा नगर 14) राजीव गांधी नगर इ. पुण्यातील ओबीसी गटातून हे मराठा समाजातील मंडळी ओबीसी म्हणून निवडून आलेत. या मध्ये भाजपाचे आठ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा सदस्य असुन राष्ट्रवादी काँग्रेस मधुन महापौर व उपमहापौर पद भोगणारे ही बोगस ओबीसी म्हुणन निवडून आलेत. तीच गत रा. काँग्रेस मध्ये महापौर किंवा स्थाई समीती पद भोगणारे भाजपात जावुन बोगस ओबीसी निवडले गेलेते. याला जबाबदार कोण कारण औरंगाबाद खंड पिठाचा निर्णय आहे. ज्याच्या शालेय दाखल्यावर मराठा - कुणबी आशी जात आहे त्यालाच लाभ मिळेल. पवार साहेबांच्या नजरेच्या टप्यात राहून सुशील कुमारांनी ही जात 2004 मध्ये जन्मास आणली आहे. फडणवीसींच्या काळात बरे दिवस येतील वाटले. होते अशीच अवस्था पिंपरी चिंचवड मध्ये आहे. या ठिकाणी 14 मराठा समाजाचे बोगस ओेेबीसी जात व धनदांडगे असल्यानेे निवडले गेलेत त्यालाही वाकवून जर फडणवीस ढोल बडवत असतील तर हे कसले दिवस ओबीसीला दिलेत ?