आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 2 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
2/3 वर्षापुर्वी वांझोट चिंतनाच बुजगावण शिबीर भरवले जात होते. एका जाणत्या पदाधीकार्याला विचारणा केली यातून समाजाचे हीत काय साधले ? एक हितच साधले पदासाठी पळणारी मंडळी जवळ आली. परिवर्तन हक्कासाठी लढणे हा बाणा उभांरण्याचे ध्येय कधीच संपलेले होते. काही मंडळींनी समाजाची खाणे सुमारी केली. शेकडो बांधवांनी पायीट करून माहिती गोळा केली काहींनी पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. काहींनी भरगच्च कार्यक्रम करून त्याला रूप दिले. यातून साध्य काय ? याचा उपयोग एकच लग्नपत्रीका पाठविण्यासाठी. एक मेकाला संपर्क करण्यासाठी. झालेच तर माहितीतून पुन्हा पदासाठी पलटण निर्माण होऊन त्यासाठी आडवा आडवी. किती साधी सोपी दिशा नेते मंडळी ठेवतात. या मध्ये कुठेच साधा ओरखडा नाही. इथे कुठेच साधा संघर्ष नाही. आणी तो असेल तर पद पदाधीकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन बसलेले. परंतू वार्ड , जिपचा गट किंवा पं. सं. गण या मध्ये समाजाचे मतदार गृहीत धरून खर्या लढाईला एक तर लंगोट बांधलाच नाही. हा लंगोट फक्त आणी फक्त समाज पातळीवरच्या आखाड्या साठी राखीव आसतो. खर्या राखीव जागे साठी तो वापरावा तर जात दांडग्यांना मराठा - कुणबी प्रमाण पत्रे आणलीत. त्यांच्या समोर लंगोट घालणे सोडाच वळचनीला जाण्यात खरे समाज निष्ठा माणनारे भेटतात तेंव्हा त्यांना मनापासुन सलाम करावयास पाहिजे यात असे ही काही समाज निष्ठ बांधव आहेत. आमची मते तुम्ही बनावट ओबीसी असला तरी तुम्हालाच मिळणार तेंव्हा आम्हाला खुश करा. अशा एजंटना ( एजंट शब्द ही योग्य नाही दुसरा आहे पण सुसंस्कृत नाही.) सलाम आपन केलाच पाहिजे. ही जी मानसीकता निर्माण झाली त्याला जबाबदार कोण ? याला जबाबदार आहेत. समाज संघटनेची नेते मंडळी. मोदी पुराणाचा फुसका बार काणठळ्या बसे पर्यंत काल्पनीक वाजवणारे या मंडळींनी आपल्या चिंतनाच्या बुजगावण्यातुन समाजाचे आशेने भरवलेल्या पदर मोड केलेल्या कार्यक्रमात हार तुर्हे स्मृती चिन्ह घेण्याशिवाय काय केले ? कुठेच यांनी मराठा - कुणब्या विषयी साधा ब्र काढला नाही. त्यांच्या या समाज निष्ठेला ही सलाम केला पाहिजे. त्यांच्या या काल्पनीक भुताच्या गोष्टीला ही सलाम खर्या लढाई पासून समाजाला दूर ठेऊन व्यक्तीनिष्ठ, व्यक्ती गौरव, व्यक्ती पुजेतून नव्या दमाच्या, नव्या विचाराच्या नव्या कल्पनेच्या, नव्या जोशाला उगवू पहाताच साम दाम व दंड याचा वापर करून संपवावे या आशा नेतृत्वाला सुद्धा सलाम. मी कोन म्हणुन काय पुसता. मी या पद धारकांचा पोसिंदा. मी सांगतो तेच सत्य. मी म्हणतो तेच निष्ठावान मी सांगतो तोच समाज द्रोही. आसा मी समाजाच्या म्होरक्या या म्होरक्यांच्या मी पणाला ही सलाम. आसे हे सलाम केल्या नंतर काही जिल्ह्यात काही महानगर पालीकेत समाजाच्या वाट्याला जो मोठा भोपळा आला. त्या भोपळ्यालाही सलाम करूया.