श्री संत संताजी जगनाडे महाराजाच्या ३१५ व्या पुण्य तिथी सोहळ्यामध्ये राहुरी कॉलेजचे प्रा. डॉ. सुधाकर चौधरी यांनी लिहीलेल्या अप्लाईड झुलॉजी व ऍनीमल सिस्टीमॅटीक्स या पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांतिक तेली समजाचे कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुषण कर्डिले, नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, बानार समितीचे सभापती अरूण तनपुरे, तेली समाजसेवक साप्ताहीकाचे संपादक प्रा. वसंतराव कर्डिले स्नेहीजनचे संपादक छगन मुळे, तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ डोळसे तालुका तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे सदाशिव पवार, संजय पन्हाळे, संदीप सोनवणे, वाय. एस. तनपुरे उपस्थीत होते.
मडॉ. चौधरी यांनी लिहीलेल्या पुस्तका विषयी अभिप्राय व्यक्त करताना श्री. तनपुरे म्हणाले डॉ. चौधरी यांनी आज पर्यंत ८ पुस्तकाचे प्रकाशन ३० संशोधन पेपर व ३० जनरल लेख लिहीले असुन राहुरी कॉलेजमध्ये वर्षापासुन कार्यास आहे त्यांनी लिहीलेले प्रस्तकाविषयी बोलताना म्हणाले सध्याच्या युगात प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्रा सारख्या पुस्तकांना अभ्यासक्रमात महत्व असुन विद्यार्थ्यांच्या द्दष्टीने साध्या भाषेत मोजक्या शब्दात लिहीली असुन तेली समाजातही डॉ. चौधरी, डॉ. कर्डीले सारखे कार्यकर्ते शौक्षणीक क्षेत्रात उत्कृष्ठ काम करीत आहे. डॉ. चौधरी यांनी महाविद्यालयात आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धा, चर्चासत्र, कार्यशाळा, राज्यस्तरीय आयोजीत करत आहे.