महाराष्ट्राच्या जडण घडणीत देशाच्या सामाजीक, सांस्कृतीक विकासाचा दिशा दर्शक म्हणुन वर्धा जिल्हा ओळखला जातो ही ठेवण आज ही जपली जाते. या जिल्ह्याने माणुस घडवीण्याची प्रक्रिया सुरू केली. एक कष्टकरी घर एक शेतकरी घर, एक पैलवान घर आशा समान्य घरातील श्री. रामदास तडस कृषी उत्पन्न बाजार समीतीचे एक सदस्य म्हणुन राजकीय क्षेत्रात उमेदवारी सुरू करतात व आज वर्धा मतदार संघाचे खासदार म्हणुन निवडून जातात. यात कोणतीही राजकीय परंपरा नाही, वारसा नाही, फार मोठे अर्थीक पाठबळ नाही तरी ते खासदार होतात हेच आपन समजुन घेतले पाहिजे.
इतर राजकीय नेते व तडस साहेब यांची तुलना केली तर त्यांचे मोठे पण समोर येते. कुणाचाही अर्शीवाद न घेता प्रथम ते 1992 नंतर विधान परिषदेवर निवडून गेले. सलग 12 वर्ष आमदार होते. पुन्हा काही काळ सत्ते पासुन दूर राहिले. पण सत्ता म्हणजे सर्वस्व नव्हे. सत्ता हे साधन आहे. साध्य आहे विकास या मुळे ते साध्या, सर्वसामान्य, विकासाकडे आशेन पहाणार्या घटकाकडे ते आपला माणुस म्हणुन पहात होते. एक वेळ ते त्या बांधवाकडे जेंव्हा सुखात असेल तेव्हा गेलेे ही नाहीत पण जेंव्हा त्याच्यावर आन्याय झाला असेल, नैसर्गीक संकट आले असेल, कौटंबीक अडचनी असतील. आशा घरात ते गले व जातात. तो पैसा नाही व संघर्षातुन बाहेर फकलेला माणुस या ममतेने तडस साहेबांना आपल मानतो, ही त्यांची जमेची बाजू. मतदार संघात फिरताना गाडीच्या काचा कधी वर घेतल्या जात नाही. जो भेटेल त्याला थांबवतील किमान चौकशी करतील किमान त्याला नमस्कार म्हणतील. ही आापूलकी त्यांनी जपली तीच त्यांची खरी शिदोरी आहे व ती जोपासणे ही विचाराची आचाराची कृतीची ठेवण व साठवणूक आहे.
सराटी हे यवतमाळ मधील आडवळणी गाव वडीलांनी देवळी येथे शेती घेतली व तडस कुटूंब देवळीच्या मातीशी एक रूप झाले. समाज, धर्म, संस्कृती जपणारे तडस साहेब विदर्भ केसरी झाले त्या दिवसा पासून त्यानी वाटचाल सुरू केली. सन 2014 च्या लोकसभा निवडणूकी पुर्वी अनेक जन खासदार कीच्या उमेदवारी साठी धडपडत होते परंतू तडस साहेब या स्पर्धे पासून दूर होते. परंतू जेंव्हा ना. नितीन गडकरी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारणा केली तेंव्हा पहिला प्रश्न मी साध्या माणसातला साधा आहे. गडकरी व फडणवीस यांना. सामान्य माणसांच्या उंबर्या आड असलेलेे उमेदवार हवे होते. आणी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. विजयाचे गणीत जमले गेले. सर्वाधीक मतांनी विजयी झेंडा फडकला गेला. या विजया मागे तडस साहेबांच्या सामान्य माणसांचा घरोबा महत्वाचा आहे. प्रत्येक गावात कोणता समाज किती आहे. त्या समाजाची नेमकी गरज काय आहे. ती गरज भागवण्याचा शब्द दिला तर हे मतदार विश्वास ठेवतील कारण विश्वासाचा शब्द पाळणे म्हणजे श्री. रामदास तडस ही त्यांची ओळख काळजाच्या सात कप्यात कोरली होती. ती होेती म्हणून किमान पाचशे कोटी रूपयांची साठवणूक असलेली विरोधी व्यक्ती व जास्ती जास्त एक कोटी रूपये असलेले तडस साहेब ही स्पर्धा होती. आणी जोडीला फक्त होते तेंव्हा मा. नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे वलय. यातूनच विजय सोेपा झाला.
विजय मिळवील्या नंतर काय ? हा प्रश्न सामान्य माणसाला सतावत आसतो. दिलेला शब्द हा निवडणुकीतला आसतो. तो पाळलाच पाहिजे असा काही दंडक नाही. पण खासदार तडस साहेबांचा याला अपवाद आहे. मी ज्या सामान्य माणसाच्या मतातून निवडलो त्याचे जीवन जगण्यातले प्रश्न, त्याच्या अडचनी, त्यांची दु:ख निवारण करण्यासाठी एक यंत्रणा उभारली. प्रश्न समजुन घेण्यासाठी यंत्रणा राबवू लागले यातून प्रश्न समोर आले. लोकसभेत स्वत: मांडायचे प्रश्न. त्यातुन त्यांची सोडवणूक व विकास साध्य करणे हा रस्ता रूळलेला परंतू सर्व सामान्य माणसाचे जे साधे प्रश्न म्हणुन पहिल जाते ते त्याच्या परस्थीती नुसार भयान असतात आणी असे प्रश्न सोडवणीकीला प्राधान्य दिले. या साठी शासकीय अधीकार्यांना सोडवणूकी साठी संधी देऊ लागले. मी खासदार आहे. त्यामुळे मी म्हणतो तेच झाले पाहिज असे नव्हे तर जे नियमात बसु शकते ते ऑफीस दिरंगाई न करता सोडवणुकीला वातावरण निर्माण केले. या मुळे संघर्ष, वाद दिरंगाई दुर होऊन सामान्यांचे प्रश्न सुटू लागले. मतदार संघातील एक जिव्हाळा, अधीकारी वर्गाच्या कक्षांतून प्रश्न मिटवणे, या द्वारे विकास साधने ही वाटचाल म्हणजे खासदार तडस साहेब होत.
विषमता ही माणूस दूरवण्याची पहिली पायरी या पायरीवर न जाता समता ही विजयी पथ ही भुमीका ते घेतात. यामुळे सर्व सामान्य मतदारांच्या कार्यक्रमाता हाजर आसतात. मग तेथे पन्नास जन असोत किंवा पाच हाजार याला ते लहान मोठे समजत नाहीत. यावर त्यांची किंमत ठेवत नाहीत तर निष्ठेला, त्यागाला ते किंमत देतात. निवडणूक ही होत आसते त्यात जय व पराजय एवढेच होते. परंतु आपण शेवटी सर्व एक आहोत. सर्वांचा विकास हा महत्वाचा आहे. सत्ता संघर्षाचा हा रस्ता व या रस्त्यावरील विरोधक हे तेवढ्या पुरते आसतात ते ही आपले असतात तेंव्हा तेे विरोधकाला ही आपलेसे करतात कटुता टाळून विकासाला प्राधान्य देतात आणी या मुळे तडस साहेब हे खासदार असुन ही सामान्य माणसाला सहज भेटतात त्याचे प्रश्न सहज सोउवतात ही वाटचाल त्यांनी स्वत: निर्माण केली आहे.