समाज संघटन कसे असावे हे खा. तडसांनी राबवले आहे. - ज्ञानेश्वर दुर्गुडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पुणे जिल्हा.
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कळसू बाईचा डोंगर कपारीतून बाहेर पडलो. भाकरी किती महाग असते हे होरपळून निघाल्या नंतर समजु लागले आपण आपली भाकरी नीट मिळवली तर ती मागे राहिलेल्या साठी मिळवण्याास हातभार लावू परंतू या लढाईत कष्ट हे करीत असताना मन कुरतडत होते. कुरतडणार्या मनातला समजावून उभा राहिलो. स्वत: स्थीर होताच समाज कार्यासाठी मन ओड घेत होते. आशा वेळी महाराष्ट्र तेली महासभा भेटली. आणी मी या संघटने कडे गेलो इथे बरेच जण भेटले पण मनात साचुन राहिले खासदार रामदास तडस. मी समाजाचा अध्यक्ष आहे मी लोकसभेचा खासदार आहे. माझे आणी तुमचे अंतर जमीन अस्मानाचे आहे . ही जी लक्ष्मण रेषा खासदार किंवा आमदार यांच्यात व सामान्य माणसात आसते असे नाते मात्र त्यांच्यात पुसट ही अनुभवला आले नाही. मी तुमच्यातला एक आहे. आपन एक ही त्यांची ओळख संघटना चालवीताना सर्वच जण एक प्रकृतीचे नसतात. प्रत्येकाची विचार प्रक्रीया सारखी नसते. तेंव्हा प्रत्येकाने एकमेकला समजून घेऊन काम केले पाहिजे मतभेदा पेक्षा समाज मोठा आहे तो समाज जीतका संघटीत तितके आपन सर्वजन मोठे होऊ. ज्या ज्या परीसरात आपण आहोत त्या त्या परिसरात राहुन आपले घर पाहुन समाज कार्य करा. राजकीय क्षेत्रात अनेक राजकीय पक्ष आहेत तेली समाज संघटनेत पक्षाला ठिकाणा देण्या पेक्षा समाज विकासाला महत्व दिले पाहिजे. त्यांचा माझा तसा अल्प परिचय म्हंटले तरी चालेल जो परिचय आला या मधुन मी बरेच शिकलो व वाटचाल करू शकलो.
त्यांनी महाराष्ट्रभर फिरून संघटनेची वाट चाल आम्हा सर्वांना दिली. म्हणून श्री. चंद्रकांत शेठ वाव्हळ यांच्या नेतृत्वा खाली आम्ही समाजात फिरलो. वाड्या वस्त्यांच नव्हे तर डोंगर दर्यातील सह्याद्रीच्या कडा कपारीत गेलो व संघटन बांधु शकलो. आम्ही त्याचा समारंभ ठेवला या साठी ते स्वत: आले आणी समाज केंद्र बिंदू ठरवून जे काम चालू आहे. याची नोंद ठेवली व आदर्श काम म्हणून त्यांंनी महाराष्ट्रभर ठेवले चांगल्या कामाची नोंद ठेवणे. काम करणार्यांना प्रोत्साहीत करणे ही त्यांची दिशा बरीच संघटनेला दिशा देऊ केली आहे.