तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया. - विजय काळे, अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा नगर
आम्हा समविचारी बाधवांना समाज कार्य करण्यात नवखेपणा होता तेंव्हा नगर वासीयांनी देश पातळीवरील समाजाचा विचार मेळावा नगर येथे ठेवला होता. पहिल्या सत्रात समाजमाता केशकाकु यांची निवड देशपातळीवर झाली. त्यावेळी तडस साहेब विधान परिषदेत आमदार होते. मी कसा तेली समाजामुळे आमदार झालो. आणि म्हणून आपन एक झालो तर आपले हक्क मिळवू शकतो. आपण गाव ते शहर पातळीवर एक होऊ मते जवळ ठेवा पण भेद विसरा यातून आपन सत्तेत जावू सत्ते शिवाय विकास नाही. आणी संस्कारक्षम वयात हे विचार बिंबवले.
तेली संघटीत होण्यासाठी ते महाराष्ट्राच्या काना कोपर्यात गेले प्रादेशीक मते जुनी पिड्यान पिड्याचे मतभेद त्यांनी मिटवून आपण सर्व तेली आहेत ही ओळख त्यांनी समाजाला दिली. ही एकमेव एैतिहासिक घटना नोंदली गेली. प्रकृतीने पैलवान समाज कारणात सर्वांना समजावून घेऊन कटुता टाळणारे त्यामुळे माझ्या सारखे हजारो युवक तेली समाज संघटनेत सक्रीय झाले.
आपले व समाजाशी नाते काय ? समाज कार्य करीताना समाज समजून घ्यावा. समाजाचे प्रश्न समजून घ्यावेत हे प्रश्न सोडवीण्यासाठी संघटीत होणे संघटीत रहाणे व संघटित पणे काम करणे या शिवाय दूसरा उपाय नाही. ही त्यांची वाटचाल आम्ही स्विकारली नगर शहर व जिलहास्तरावर काम करू लागलो. नगर शहरात समविचार बांधवांनी संघटीत पणे कार्य सुरू केले. यातून तैलीक महासभा रूजली गेली. आज ही संघटना घराघरात मना मनात यांसाठी नगर शहर जिल्ह्यास्तरावर हजारो जन राबत आहेत. या पुर्वी ही राबणार्या बांधवांनी रस्ता निर्माण केला होता. याच मुळे खासदार तडस साहेबांच्या मार्गदर्शनाने वाटचाल करीताना आम्हाला चांगली वाटचाल करता येते.
आज 1 एप्रिल म्हणजे खासदार तडस साहेबांचा वाढदिवसा या निमित्ताने नगर बांधवा तर्फे हार्दिक शुभेच्छा व भविष्यात ते केंद्रात मंत्री होवो ही सदिच्छा.