नाव सार्थक करणारे खा. तडस ! - प्रफुल्ल व्यास, वरिष्ठ उपसंपादक, दै. तरूण भारत, वर्धा
नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हंटले. परंतु आपल्या संस्कृतीत नाव ठेवण्याचाच कार्यक्रम (बारसे) धुमधडाक्यात केले जाते. याचा अर्थ नावातच सर्वकाही आहे. आईने ठेवलेलेे नाव यथार्थ कसे करायचेे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. देवळी सारख्या छोट्याशा तालुका स्थानावरून राजकारणाची सुरूवात करणार्या खासदार रामदासजी तडस यांनी आईने ठेवलेेले नाव सार्थक लावण्याचा जणू चंगच बांधला असल्याचे त्यांच्या कार्यशैलीतुन स्पष्ट होते. अयोध्या निवासी प्रभूरामचंद्राचे पट्टशिष्य रामदास स्वामी ! रामदास स्वामींनी भावीपिढी ‘बलदंड’ होऊन ते शत्रुसोबत लढण्यासाठी तयार व्हावे यासाठी 11 मारोतींची स्थापना करून सुर्यउपासक असणार्या रामदास स्वामींनी ठिकठिकाणी व्यायाम शाळा निर्माण केल्या होत्या. लहानपणापासून कुस्तीची आवड असणार्या रामदासाजी तडस यांनी कुस्तीत मानाचा असलेला केसरी किताब वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी मिळवला. हा किताब मिळवून ते शांत असतील तर तडस कुठले ? भावी पिढीही बलवान होण्यासाठी त्यांची अजुनही तळमळ कायम आहे. गावखेड्यात व्यायामशाळा तयार करण्यासाठी, त्यामध्ये साहित्य देण्यासाठी रामदासजी एका चुटकीत निर्णय घेऊन होकार देतात. आता युवकांसोबत युवतीही कुस्तीत मागे राहु नये म्हणून युवतींसाठी तालीम कुस्ती विकास योजनेंतर्गत आखाडा वर्धात आणण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. हा झाला त्यांचा सामाजिक भाव !
सामाजिक चळवळीतून रामदासजींचे राजकारणात पदार्पण झाले. कार्यकर्त्यांचे भान ठेवण्याचे कसब असणार्या तडस साहेबांनी देवळी येथे सुपरफास्ट बसेसचा थांबा मिळविण्यासाठी केलेले आंदोलन आसो की शेतकर्यांच्या कापसाला भाव मिळावा यासाठी केलेला रास्ता रोको आसो यात राजकारण असले तरी आपल्या गावासाठी आपल्या शेतकर्यांसाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्यात होती म्हणुनच त्यांच्यातील नेता देवळीकरांनी ओळखला. आपल्या देवळीचे बारामती करण्यासाठी सक्षम असलेले रामदासजी नगराध्यक्ष ते खासदार अशी पायरी चढत गेले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्षपद असो की आज खासदार ! आलेल्याला भेटून, त्याची समजुत काढून त्याला न टाळता त्याचे काम कसे करता येईल यावर आजही खा. रामदासजी तडस यांचा भर असतो.
राजकारणात महत्वाचे पद असल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांच्या अनेक अपेक्षा असतात. त्या अपेक्षांची पुर्ती करणे शक्य नसले तरी त्यातुन पर्याय मात्र खा. तडस शोधुन काढतात. अगदी एखाद्या दुचाकीवर ट्रिपल सिट जात असताना ट्रॉफिक पोलिसांनी अडवल्यानंतर एखाद्या मतदाराचा फोन आल्यावर ट्रॉफिक पोलिस सोबत खासदारकीचा रूबाब न दाखवता पोलिसाला समजावुन दुचाकी स्वाराची सोडवणूक केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
ज्या मतदारांनश्ी आपल्याला निवडुन दिले त्यांना किंवा ज्यांनी कोणी कार्यक्रमाचे आयोजन केले असेल त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर खा. तडस यांचा भर असतो. अगदी पायाला भिंगरी लावल्यागत ते आपला वर्धा लोकसभा मतदार संघ पिंजुन काढतात. त्यामुळेच ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. त्याच तळमळीतुन गेल्या आडिच वर्षात लोकसभेत 277 तारांकित प्रश्न खा. तडस यांनी मांडले. शुन्य प्रहरात 96 तर नियम 377 मध्ये 56 प्रश्न त्यांनी उपस्थित केले असुन त्यावर निर्णय मिळवला आहे. लोकसभेचा पुर्वानुभव नसताना संसदेत आपल्या मतदार संघाचे प्रश्न मांडुन 85 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती ही खा. तडस यांनी लावली आहे.
जे काय नवीन असेल ते आपल्या मतदार संघात आणण्यावर त्यांचा भर असतो म्हणुनच देशातील 17 फुडपार्क पैकी 1 फुडपार्क कारंजा (घाडगे) तालुक्यातील सिंदी विहिरा येथे तर भारतातील 2 ड्रायपोर्ट पैकी 1 सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे आपणण्यात यश मिळवले. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटवार यांच्या सोबतची त्यांची गट्टी ही तेवढीच महत्व पुर्ण ठरते. शासनाकडून आलेला योजना प्रशासनातून पुर्ण केल्या जाते. खा तडस यांचे प्रशासकीय अधिकार्यांसोबतही तेवढेच जवळचे संबंध असल्याने अगदी खेळीमेळीत हास्य विनोदात अनेक कामे खा. तडस सलटवुन टाकतात. परिणामी सरकरी यंत्रणा त्यांच्या सोबत जडुन आहे.
लोकसभा मतदार संघात रस्त्याचे विक्रमी जाळे तयार झाल्याने राज्य सरकारचा काही आर्थिक भरभराट त्यांनी केली. लोकसभा मतदार संघा सोबत कायम संपर्कात असलेले खा. तडस साहेब यांचा बुट्टीबोरी ते यवतमाळ हा स्वप्नातील रस्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दत्ता मेघे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधाकर मुनगंटीवार यांच्या सह अनेकां सोबत संबंध ठेवणारे खा. रामदास तडस वर्धाच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणार आहेत. ईश्वर त्यांची सर्व स्वप्ने पूर्णत्वास नेवो, याची ‘तरुण भारत’ तर्फे शुभेच्छा !
प्रफुल्ल व्यास, वरिष्ठ उपसंपादक, दै. तरूण भारत, वर्धा