नागपूर :- आखील भारतीय तैलिक साहू महासभा या देश पातळीवरील राष्ट्रीय कार्यकारणी सभेस विविध राज्यातील पाचशे च्या दरम्यान बांधव उपस्थीत होते. संघटनेचे अध्यक्ष आ. जयदत्त क्षिरसागर हे अध्यक्ष स्थानी होते. या वेळी ना. बावनकुळे यांनी आपल्या समाज निष्ठे विषयी विचार व्यक्त केले. या वेळी श्री भस्मे सरांनी प्रस्ताविक केले श्री. कृष्णराव हिंगणकर यांनी गत दोन वर्षाचा हिशोब मांडला. 15 लाख रूपये शिल्लकीचा हिशोब सभागृहा समोर ठेवला. खर्चावर सदस्यांनी आपली मते मांडल्या नंतर सर्वानुमते संमती देण्यात आली. या वेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांनी संघटनेचे महत्व स्पष्ट करतीना सांगीतले. या नंतरची देश पातळीवरील मिटींग वर्धा येथे ठेवा. आम्ही सर्व त्याची व्यवस्था पाहू. या वेळी आ. खोपडे यांनी समाजाचे नगर सेवक निवडून आणण्यात कसे कष्ट घेतले हे स्पष्ट केले. नागपूर महानगर पालिकेतले सर्व पक्षीय नगर सेवकांचा उचित सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. प्रिया महिंद्रे संदिप चिलेकर, कहाणे, उबाळे सर व मोहन देशमाने उपस्थीत होते. यावेळी सुभाष घाटे यांना राष्ट्रीय संयुक्त सचिव पद देण्यात आले. तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे यांना राष्ट्रीय राजनीती परिकोष्ट पद देण्यात आले. श्री. रमेश गिरडे यांनी जवाहर वसतीगृह उपलब्ध करून दिले होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री. कृष्णा हिंगणकर व सुखदेव वंजारी, अरूण टिकले, दिनेश म्हस्के, मंगेश सातपुते, धमेंद्र कामोरे, शैलेंद्र साहु, कृष्णा कामडी, गजू डफ, सरिता मदनकर, अलका ढोबले, देवेंद्र ढोबले, पुष्पा भाजीपाले यांनी केले.