इंदापूर (प्रतिनिधी) :- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील तालुका तेली समाज महासभा श्रीसंत संताजी महाराज जगनाडे ट्रस्ट व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संताजी महाराज पुण्यतिथी उत्सव आगळ्या वेगळ्या व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला नव्हे हा उत्सव सोहळा म्हणजे समाजाला एक नवी दिशा देणारा ठरावा असा झाला.
या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधुन रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये ५१ जणांनी रक्तदान केले. या बरोबरच इ. १० वी मधील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थींनींचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच आदर्श असा कार्यक्रम म्हणजे समाजातील श्रीमती सविता संजय किर्वे यांचा आदर्शमाता पुरस्कार देवून प्रसिद्ध उद्योजक व पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष पोपटराव गवळी यांचे हस्ते गौरविण्यात आले. श्रीमती सविता किर्वे यांनी पति निधना नंतर खचून न जाता खंबीरपणे पिठाची गिरणी चालवून मुलगा व मुलगी यांना शिक्षण दिले. याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तर त्यांच्या मुलांना समजाकडून एक वर्षासाठी शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेण्यात आले. तर धोरतवाडीचे नुतन सरपंच समाजबांधव धोत्रे यांचा सत्कार पुणे जिल्हा प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष अजय किरवे यांचे हस्ते करण्यात आला. या बरोबरच धार्मीक कार्यक्रमही घेण्यात आला. यामध्ये किर्तन व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वर्षी प्रथमच पुण्यतिथी सोहळा तालुका पातळीवर करीत सर्वांना निमंत्रण देण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राकेश कर्डीले उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष पोपटराव गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष शिवराज भिसे, उत्सव समिती अध्यक्ष महेश भिसे, सचिन क्षीरसागर, वैभव देशमाने, शैलेश दहिफळे, अशोक चिंचकर, दत्ता भिसे, संतोष घोडके, महेश माकुडे, विशाल चिंचकर, ज्ञानेश्वर चिंचकर, ज्ञानेश्वर खेडकर, अभिजित जठार, सागर जठार, यांच्यासह पदाधिकारी व युवकांनी परिश्रम घेतले.