या वर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून 2017-18 च्या शैक्षणिक वर्षाकरिता खालील प्रकारच्या शिष्यवृत्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) प्रतिवर्षाप्रमाणेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवड झालेले विद्यार्थी.
2) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्या Common Enterance Exam for all India Services साठी IAS, IPS इ. उच्चक्षेणीच्या पदासाठी होणार्या, प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होवून अंतिम निवडीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार.
3) महराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यस्तरीय प्रथम श्रेणीच्या ( Deputy Cllector:Dy.S.P.Dy. Registrar B. इ.) प्राथमिक परीक्षांतील उत्तीर्ण विद्यार्थी.
4) भौतिक (Physics), रासायनीक (Chemistry), गणित सारख्या मूलभूत विषयांत पदव्यूतर (M.Sc./M.A.) अथवा संशोधनात्मक (Ph.D.) अभ्यासक्रम स्विकारणारे विद्यार्थी.
5) चार्टर्ड अकांऊण्टंट (C.A.), कॉस्ट अकांऊण्टंट (ICWA), चार्टर्ड फायनान्स अॅनालिसीस्ट (C.F.A) , ह्यूमन रिसॉर्सेस डेव्हलपमेंट (H.R.D.) इ. अभ्यासक्रमांची निवड करून त्यांची प्राथमिक चाचणी परीक्षा उर्तीण झालेले विद्यार्थी.
6) महाराष्ट्रातील ख्यातनाम महाविद्यालयांत कमर्शियल आर्टस, फाईन आर्टस, इ. च्या विविध शाखांत प्रवेश मिळवून या विषयातील पदवी / पदविकांचा अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी.
प्रतिवर्षी प्रमाणे वरील विषयांपैकी क्र. 1 द्वारे येणार्या अर्जाची छाननी करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांस वार्षिंक रू. 10,000/- (रूपये दहा हजार) या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाईल व त्या विद्यार्थ्यांने आपला शैक्षणिक स्तर समाधानकारक राखल्यास त्याला, त्याने स्वीकारलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. क्र. 2 ते क्र. 6 मध्ये निर्देशिलेल्या अभ्यासक्रमासाठी आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांनी निवडलेला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, त्यासाठी लागणारी आर्थिक गरज व अर्जदार विद्यार्थ्यांची आर्थिक निकड या सर्व बाबींचा फौंडेशनच्या शिक्षण तज्ञांकडून व मार्गदर्शकांकडून विचार विनिमय करून शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी निश्चित केला जाईल व सदर रक्कम निवडलेल्या विद्यार्थ्यांस देण्यात येईल.
सदर निवड ही फौंडेशनच्या शैक्षणिक समितीमार्फत आजवर नि:पक्ष रित्या केली गेलली आहे व यापुढेही केली जाईल तसेच निवडीबाबतचा समितीचा निर्णय अंतिम समजून त्याप्रमाणेच शिष्यवृत्ती वाटपाची कार्यवाही केली जाईल. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पत्यावर स्वत:ची संपूर्ण माहिती, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक व ई-मेल ऑड्रेस इ. लिहून पाठविल्यस त्यास शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज विनामूल्या पाठविण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांची पूर्वकल्पना नसल्यास फक्त रू. 5/ ची मनिऑर्डर पाठविणार्या इच्छूकांना पाठविणे केवळ अशक्य आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
शिष्यवृत्तीचे अर्ज आपणांस वेबसाईट वर उपलब्ध आहेत. अर्जांची प्राथमिक छाननी द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी काही केंद्रावरून द्वारे संपर्क साधून प्रत्यक्ष मुलाखत घेण्याचा मानस असून, त्यानंतर अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने अर्जात नमूद केलेल्या जागेत स्वत:चा दूरध्वनी क्रमांक, ईमेल ऑड्रसे इ. सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. प्राथमिक चाचणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी याबाबत संपर्क साधून, त्यांची मुलाखत घेतल्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे प्रत्येक अर्जदाराने जाणीव ठेवावी.
आपल्या संपर्कातील समाजबांधवां मार्फत, नातलगांमार्फत या उपक्रमास भरीव आर्थीक मदत द्यावी. सर्व देणगीदारांस आयकर नियम 80 जी तरतूदीनुसार करमाफी मिळते याची अवश्य नोंद घ्यावी तसेच आपल्या परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांस या शिष्यवृत्ती योजनेचे माहिती जरूर द्यावी, ही विनंती करीत आहोत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2017 आहे. याची नोंद घ्यावी.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्याचा व अर्ज भरून पाठविण्याचा पत्ता
श्री शनैश्वर फौंडेशन, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना
द्वारा : श्री. प्रभाकर संतु कोते-विश्वस्त
बी/26, श्री. सतगुरू को-ऑप. हौ. सोसायटी, 90 फूट रोड, भांडूप गांव, भांडूप (पूर्व), मुंबई 400 042
भ्रमणध्वनी : 9821431718