विद्यमान ट्रस्टच्या वतीने गेली 37 वर्षे संपूर्ण महाराष्ट्रामधील आपल्या तेली समाजातील इ. 12 वी चे नंतर विविध अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा उपक्रम अखंडपणे चालू आहे.
इयत्ता 12 वी चे पुढे इंजिनियरींग, मेडीकल, मॅनेजमेंट व कॉम्युटर टेक्नॉलॉजी इ. व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज केलेल्या त्या एका वर्षासाठी प्रत्येकी रू. 500/- रू. पाच हजार, ची आर्थिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
आलेल्या अर्जांमधून शैक्षणिक गुणवत्ता, निवडलेला अभ्यसक्रम व पालकाची आर्थिक स्थिती या निकर्षावरच मर्यादित विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
टीप : छापील अर्ज रू. 5/ चे पोष्टेज लावलेला व स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा पाठवून अर्ज मागवून घेणे. अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून घेणे.
ट्रस्टचे अधिकृत छापील अर्जच (भरून पाठविलेले) विचारात घेतले जातील.
होतकरू विद्यार्थ्यांनी छापील अर्ज दि. 30 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्जात नमूद केलेल्या पत्यावर पाठविणे.
अर्जांसाठी संपर्क
श्री. प्रभाकर कोते (ट्रस्टी)
बी./26, श्री. सतगुरू हौ. सोसायटी 90 फुट रोड, भांडूप गांव, भांडूप (पूर्व) मुंबई 42
मो.बा. 9821431718
श्री. संतोष शेजवळ (ट्रस्टी) मुंबई फुलवाले धर्मशाळ, मु. आळंदी (देवाची) चाकण चौक, ता. खेड, जि. पुणे मो. बा. 9371234704
श्री. मनोज भागवत (मॅने. ट्रस्टी), 3, मुरारजी पेठ, सोलापूर 1 मो.बा. 9890500005