कोकण तेली समाज - महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजप्रबोधन व सामाजिक एैक्याच्या बाबत आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी सदर राज्यस्तरीय कार्यक्रमास आलेल्या बांधवांची राहण्याची, भोजन व बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल कोकण विभागाचे तोंडभरून कौतुक केले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रातदासजी तडस यांनी आपल्या मार्गदर्शनावर अध्यक्षीय भाषणात समाजातील विविध घटकांना संघटीत होण्याचे आवाहन करून आपण ज्या समाजात जन्मलो आहोत, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, समजाने आपल्या न्याय हक्कासाठी प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी दाखवावी. युवकांचे सक्षम संघटन मजबूत असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे वर्धा मतदारसंघात अनेक वर्ष मला दाखवून दिले आहे. समाजाने मला खूप सहकार्य केले आहे. महाराष्ट्र राज्यात सुद्धा मला संघटन अपेक्षित आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे असे अवाहन केले.
कोषाध्यक्ष गजानन शेलार व कार्याध्यक्ष अशोककका व्यवहारे यांनी कोकण विभागाने अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तीने व्यवस्था केल्याबद्दल कौतुक केले. पावसा पाण्यामध्ये एवढ्या दूरच्या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करणे खूप कठीण असते असा अभिप्राय दिला. स्वामी शिवाचार्य महाराज यांनी भारताचा इतिहास म्हणजे तेली समाजाचा इतिहास हे विविध उदाहरणे देवून दिले.
कोकण विभागाचे अध्यक्ष सतीश वैरागी यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाचे श्रेय माझे एकट्याचे नसुन ते रत्नागीरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हयातील समाज बांधवाचे आहे. रघुवीर शेलार व त्यांचे पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेवून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. रामदासजी तडस यांनी 20 वर्षापूर्वी रत्नागिरी येथे संताजी जगनाडे देवळात बैठक घेतली होती. त्यांची 20 वर्षापूर्वीची संकल्पना आज खर्या अर्थाने सार्थक होत आहे. आपल्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीतील डॉ. भूषण कर्डीले, गजानन शेलार यांनी महाराष्ट्रात झंझावाती दौरे केले त्यामुळे हा समाजाच्या विकासाचा वटवृक्ष झाला आहे. डॉ. भूषण कर्डिले, गजानन शेलार, अशोक व्यवहारे, संजीव शेालर यांसारखे बुद्धीवान लोक असल्यामुळे तैलिक महासभेचेी बळकटी चांगली झाली आहे. कोकणातील समाज बांधव जरी मुंबईमध्ये नोकरीसाठी गेले असले तरी सण साजरे करण्यासाठी ते आवर्जून कोकणात येतात त्यांचे कोकणाच्या लाल मातीवर अत्यंत प्रेम कोकण या शब्दाला आमचे कोकणवासियांचे प्रेम आहे. तरी या विभागाचे नाव कोकण विभाग ठेवावे अशी विनंती कोकण अध्यक्ष सतीश वैरागी यांनी केली व त्यास रामदास तडस व डॉ. भूषण कर्डिले यांनी कोकण विभाग हेच नाव राहिल म्हणून मान्यता दिली व सर्व समाज बांधवांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी, जि. प. सदस्य रेखाताई झगडे, विनोदजी झगडे, पंचायत समिती सदस्य अभिजीत तेली, नगरसेविका स्मिता पावस्कर, सुप्रिया रसाळ, स्नेहा कुवेस्कर यांचा गौरव करण्यात आला तसेच क्रिडा क्षेत्रात प्राविणय मिळविणारे स्नेहा रहाटे, संदिप नांचनकर यांचा सत्कार करण्यात आला व रामदास तडस यांनी स्नेहा रहाटे हिस 10 हजाराची मदत केली. कमलाकर शेलार हे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचळ येथील रहिवासी असून त्यांना कोकण भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी जिलहध्यक्ष रघुवीर शेलार यांनी रत्नागिरी येथे समाज भुवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तडस यांनी आपल्या भाषणात विनंती केली. तसेच हा कार्यक्रम कोकण अध्यक्ष सतीश वैरागी यांच्या मागदर्शना खाली पार पडला आहोत असे संबोधले. तेलाचा घाणा, कार्तिेक महिन्यातील पंढरपूरच्या विठ्ठल व वारकरींचे चलचित्र देखावा व तुतारींने पाहुणांचे स्वागत केले हे आकर्षक ठरले. सभा कार्यक्रमानंतर राज्यस्तरीय कॉन्फरन्स घेण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष व पदाधिकारी यांची बर्याच विषयावर चर्चा होवून शंकेचे निरसन केले. सुत्र संचालन प्रभाकरखानविलकर यांनी केले महाराष्ट्रातील प्रांतिक, तैलिक महासभेचे विभाग प्रमुख जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.