आता आपली जात कोणती ? ( भाग 2 )
बाळ गंगाधर टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणतात त्यांच्या या प्रतिमेला सलाम करून एक कोकणस्थ ब्राह्मण किती मोठा होता हे ही पटवून देतात. एक कोकणस्थ ब्राह्मण असूनही तेली तांबोळी यासारख्या हिन जातींना आपले म्हणून त्यांच्या साठी आयुष्य वेचणारा महान माणूस म्हणून सांगतात व त्यांच्या फोटोला सलाम ही करतात. कुणी कुणाला सलाम करावा कुणी कुणाला महान म्हणावे या बद्दल ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. परंतू या टिळकांना तेली तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असाल तर माझे एकचमत आहे. या महान पुढार्याने तेल्या साठी काय काम केले तेवढे तरी त्यांच्या जीवन चरित्रातून दाखवा. ते जर सापडत नसेल तर आथनी जि. बेळगाव येथील जाहीर सभेत हेच टिळक म्हणाले तेली, कुणबी यांचे सत्तेत जावून तीच कामे करावयाची काय ??? महात्मा गांधीनी तेली म्हणून मिरवण्याची काही राज्यात स्पर्धा सुरू आहे. त्यांचे म्हणजे काँग्रेस वाल्यांचे बरे दिवस होते तेंव्हा ही स्पर्धा तिव्र होती पण आज ही कार्यक्रम पत्रिकेवर महात्मा गांधी असतात. मा. गांधी व तेली याचा संबंध काय याचा ही पाठपूरावा करू लागलो तेंव्हा समजले महात्मा गांधी हे त्या वेळच्या मद्रास राज्यात म्हणजे तमीळनाडू मध्ये एका भाषणात म्हणाले त्यांचा आशय तेली समाजाचा जोडला गेला. महात्मा गांधीच्या जीवन चरित्रात कुठेच त्यांच्या जाती बाबत तेली उल्लेख नाही. आज जगातीक पातळीवरील संशोधकांनी चरित्र ते तेली आहेत हा उल्लेख केला नाही. गांधी आडनावाची पारसी समाज आहे. परंतू आज कोणच त्यांना तेली न म्हणता बनीया म्हंटले जाते. आमच्या शालेय जीवनात महात्मा गांधींच्या घरातले वातावरण हे अतीशय कर्मठ होते. कर्मठ म्हणजे स्पर्श व अस्पर्श कडक पाळणारे आशा घरातील होते. गांधी हे ज्या काळात वकील झाले त्या काळात शिक्षणाची दरवाजे सुद्धा थोडे उघडले होते. तेली समाजा सारख्या जाती तश्या या दरवाज्या पासुन फार दूर होत्या या वेळी महात्मा गांधी वकील होतात. एका बनियाची केस घेऊन अफ्रिकेत जातात. त्या ठिकाणी वकिली करता सामान्य साठी लढतात. त्यांच्या जीवनभर किंवा त्यांच्या वंशजांनी स्पष्ट अस्पष्ट कुठेच तेली समाजाचा उल्लेख केला नाही. परवा परवा तर भाजपा या राजकीय पक्षाने त्यांची बनिया ही जात जाहिर केली. महात्मा गांधी हे तेली आहेत तर मग त्यांचा खुन होतो. मारेकर्यांचे आज कौतुक होते तर एक ही तेली का ब्र काढत नाही.