आता आपली जात कोणती ? ( भाग 3 )
उंच झाड या झाडाला तेली लागतो. हे वास्तव आपन पाहाणार आहोत. या समाजाला किती ही उच्चवर्णीयांनी पुर्वी प्रत्यक्ष आज अप्रत्यक्ष यातिहीन ठरवले तरी या जातीचे नाव घेतल्या शिवाय त्यांचा कार्यभाग साधू शकत नाही. या बाबत माझे नवे पुस्तक थोड्या काळात समोर येत आहे. काँग्रस व भाजपा हे दोन्ही पक्ष क्षत्रिय ब्राह्मण याजीतींच्या फेंडरेशन वर उभे आहेत. या दोन्ही पक्षाचे लक्ष व भक्ष हे मुळात ओबीसी जाती वर्ग व दलित आहेत. मुसलीम हे साधन आहे साध्य करावयास ओबीसी आहे. या ओबीसींचा जिव्हाळा हा मुळात ओबीसींचे खासदार 1977 मध्ये निवडून गेल्या नंतर झाला. त्या वेळच्या ओबीसी संसद सदस्यांच्या अग्रहामुळे मंडल आयोग नेमला. या वेळी भविष्य जाणार्या आजच्या भाजपाने सत्तेतून घटस्फोट घेऊन भाजपा उभा केला. मंडल पुन्हा काँग्रेसच्या कार्यकाळात बंद पेटीत ठेवला. एक आपघात म्हणुन लागू झाला. आणी या वेळी अनेक राज्यात ओबीसींनी आपल्या मतावर राजकारण बदलले. आपन ओबीसी आपली 52 टक्के लोकसंख्या ही काय करू शकते हे समोर आले. त्या वेळी भाजपाने ही याच ओबीसी समाजातील तरूणांना 1977 पासून आपले मानून उभे केले. त्यांना काँग्रेसच्या नितीचा फटका बसला होता. त्यामुळे जात समुह जागे होऊ लागले. आणी भाजपा असा एक ओबीसी ओळख सांगू शकणारा चेहरा घडवत होती. घडवू पहात होती. तो त्यांना मिळला. जून मध्ये मी महाराष्ट्राची कुलदैवता भवानी माता यांच्या जीवनावर अभ्यास करीत होतो तो करिताना रा. चि. ढेरे यांंचे संशोधन अभ्यासू लागलो. तुळाजापूर येथे मातंगी म्हणजे मातंग समाजाचे मुख्य प्रवेश द्वार आहे. येथे दलित समाज पिड्यान पिड्या महत्वाचा मान घेऊ घेऊन सेवेत आसतात. स्थलंतरीत काही झाली. या स्थलांतरीत झाली. गुजराथ मध्ये आपली दैवते बरोबर घेऊन जातात किंवा येतात हे उघड सत्य आपन अनुभवातो. या स्थलांतरीत मंडळींनी आपली भवानीमाता सोबत नेहली तीचे छोटे का होईना सुंदर मंदिर उभे केले. या मंदिराला लोक मानसांची जेंव्हा रिघ लागली तेंव्हा स्थानीक परिसरातील ब्राम्हण मंडळींनी त्या मंदिराचा ताबा घेतला. रा. चि. ढेरे स्पष्ट नमूद करतात. ताबा घेणारी ही मोड ब्राम्हण होती. सत्य कठोर आसते ते पचविणे अवघड असते गुजराथ मधील सोळंकी नावाचे माळी समाजाचे एक ओबीसी संशोधक आहेत. त्यांनी सांगीतलेला भाग येथे मांडतो. काही ब्राह्मण व बनाई मंडळी. बनाई म्हणजे व्यापारी किंवा ब्राम्हणी भाषेत वैश्य ही राजपुत राजाकडे होती. त्यांना सन्मान होता. हे सर्व राजा होता तो पर्यंत राजाचे राज्यच जाताच ही मंडळी गुजराथ मध्ये गेली. येथे गेले तेंव्हा किंवा आज ही गुजराथ शेंग माहेर घर आहे. जो धंदा तेजीत आहे त्याचा विचार करून त्यावर कमांड मिळवणे ही बनीया समाजाची वैशिष्ठे आहेत. या बनियांची शेदिडशे घरे हा धंदा ताब्यात ठेऊन होती. जसे कोकणातील राजन तेली नावाने तेली आहेत. परंतू वैश्य आहेत. तसी ही मोड जमात व्यवसाय करीत होती. यातील जमेल तो व्यवसाय करणे व यश मिळविणे हा यांचा स्थायीभाव त्यामुळे चहा विकता विकता सातारच्या एक ब्राम्हणाने हेरून घडन केली. याच वेळी तर मागास समाजाच्या केंद्र भवती सत्ता कारण फिरत होते म्हणून भाजपाने, कै. गोपीनाथ मुंडे, उभा भारती, यडूरप्पा, नरेंद्र मोदी या सारखी ओबीसी किंवा त्या जातीतले युवक 1977 पासुन घडवावयास सुरूवात केली किंती ही विकास पुरूष असो. किती ही ब्राम्हण निष्ठावान असो परंतू लोकशाहीत जात व जात समुह हे महत्वाचे ओळखून त्यांना एक कणखर व निष्ठावान नेता हवा होता. याच वेळी मोड जात की ज्यांची शंभर घरे ही असावीत त्यांना तेली ओबीसी केले. कारण राज्य सत्ता हातात असल्याने कोणच काही करू शकत नव्हते. मतांचे गणीत जमवीण्यासाठी मोड जात ही तेली केली आहे. तेली हे ओबीसी आहे तेली हे अतिमागास आहेत. अशा या मागास जातीचा चेहरा एक तेली म्हणून तयार करावयाचा म्हणून तयार केला गेला. याच बळावर पंतप्रधान झाले. हे वास्तव मी मा. नरेंद्र मोदी यांचा विरोधक म्हणून न मांडता काय घडले हे समजून घेऊन मांडत आहे.