आता आपली जात कोणती ? ( भाग 4)
मी बीडच्या स्टाँडवर मुक्काम करून. 1991 साली समाजमाता कै. केशर काकूंची माहिती गोळा करून गौरव ग्रंथ प्रसिद्ध केला. काकूंची वाटचाल मी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली आज पर्यंत त्या कुटूंबाने तेली गल्ली मासीकाला एक रूपया ही दिला नाही. आणीतरी मी माझी प्रेरणा म्हणून सांगत नाही तर अभीमानाने मिरवतो. क्षिरसागर कुंटूब सत्तेत असताना साधे भेटायचे म्हंटले तर लाईन लावून असत. विश्वास दाखवून ते निष्ठा दाखवत क्षिरसागर घराण्याची सत्ता कमी होताच बरेच जण खाजगीत सांगतात समाजात भाषण देणे समाज विकासाच्या गप्पा सांगून समाज संघटन करून सत्तेत जाणे. ही मंडळी आज स्वत:ला तर फसवतात पण तेवढाच समाजाला ही दगा देतात. सोशल मिडीयावर किंवा तेली मिडीयावर सातत्याने कार्यक्रमात झळकणारे मा. नरेंद्र मोदी यांचे बंधु व त्यांची पत्नी समोर येतात. त्यांची भाषणे गाजतात. गेले तीन वर्ष त्यांना शोधून समाज एकत्र करण्यासाठी त्यांचे सत्कार व भाषणे एैकून समाजाला काय मिळाले हे एैकण्याच्या समजून घेण्याच्या मनस्थीत समाजाची कर्ती नाहीत. त्यांना हे डेरेदार झाड तेल्याचे आहे का नाही हे नक्की माहित असुनही. हे तेली समाजाचे झाड आहे. निदान इथे सावली मिळेल हा भाबडा आशा वाद भविष्य घडवू शकतो का ?