आता आपली जात कोणती ? ( भाग 5 )
या देशाचे पंतप्रधान असलेल्या मा. नरेंद्र मोदींच्या लहान बंधूनी उत्तर पद्रेशात सांगीतले आता आपण सर्व पोटशाखा विसरू देशातील जगातील सर्व हिंदू तेली एक होऊ व जगाला पटवून देऊ जग कवेत घेणार्या मा. नरेंद्र मोदी यांचा हा मोदी तेली समाज आहे. स्वहिता साठी समाजाचा बुरखा घेऊन वावरणारे जी तमाम स्वघोषीत समाज हित कर्ते आहेत त्यांनी ढोल वाजवायास सुरूवात केली सोशल मिडीया आशा पोष्टने जेंव्हा व्यापला तेंव्हा त्यांच्या ढोलाचे कातडे आनेकांनी त्याच भाषेत फाडून काढले. या दोघांच्या वादात एक गोष्ट बाजुला राहिली. आपन गांधींना तेली समजून आपन मोदी घराण्याला तेली समजून समाज मोठा झाला ? समाजाला राजकीय सामाजीक, आर्थीक व धार्मीक विकास झाला का ? पोट शाखांचे केळवण करून बोळवण करणारी तसे समाजाच्याहिताचा बुरखा पांघरून फिरतात तशी आज मोदी तेली म्हणून समाजाचे फड गाजवतात ही सर्व मंडळी किंवा त्या पुर्वी फड गाजवणारी मंडळी ही त्यांच्या राजकीय नफा तोटा पाहून संघटन चालवतात. राजकारणाची वस्त्रे कुलूप बंद करून किंवा पडद्या मागून राजकीय सत्तेला हात मिळवणी करून गणीते मांडण्या पेक्षा. सामाजीक प्रश्न चव्हाट्यावर मांडणारा नेता हवा. असा नेताच दहा टक्के तेली समाजाचा शिल्पकार असेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुर्वीच्या महार समाजाचे त्यांची लोकसंख्या देशात 8 टक्के नही. पण त्या समाजाला विचारल्या शिवाय सोबती शिवाय निदान कोणालाच सत्ता मिळत नाही. नाहीतर देशात मुस्लीम तेली समाज ही ंघटना आकाराला आली आहे. तीचा प्रभाव वाढत आहे. उद्या शंभर वर्षाने काय घडेल हे सांगता येणार नाही. जर ही मंडळी बलवान झाली तर आपले पुर्वज म्हणतील आरे आम्ही सुद्धा तेलीच फरक फक्त मुसलीम तेली म्हणन्याचा. कारण आपण स्वप्रकाशीत न रहाता परावलंबी रहाण्याचा हा परिणाम.
- जय संताजी