पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 1 )
आम्ही पडताळणी आपल्यात नेहमी करतो. समाज पातळीवर आम्ही अग्रेसर या ठिकाणी आम्ही राजे आसतो. या ठिकाणी आमचा निर्णय हाच अंतिम असतो. तो इतका असतो की यात आमचे इतके दर्दी आम्हीच आसतो. आपल्या पडताळणीचे विषय आपन कोणते असतात. ते पाहू ? आम्ही लग्ना साठी नात्यांची पडताळणी करतो. आम्ही आर्थीक पडताळणी करतो. आम्ही ज्याच्याकडे पैसा आहे त्याची जात पडताळणी करत त्याला आपन मोठं म्हणतो. समाजपातळीवर त्याची जात पडताळणी सुद्धा मोठी आसते. समाजाच्या विकासाच्या, अधोगतीच्या नाड्या आपण त्याच्या जवळ देतो. विचाराची आचाराची, संस्कृती पाहातोच असे नाही. मध्यंतरी एक हजार व पाचशे रूपयांच्या नोटा रद्दीत केाणी घेइना तरी सद्धा आम्ही अशी ही पडताळणी करून पाहिली आमच्या पैसे वाल्याकडे पाहिले तेंव्हा अशा नोटा नव्हत्याच. आमची हि सुद्धा पडताळणी आम्ही करून पाहिली. शाखा व पोटशाखेची आम्ही शाखा पडताळणी पावलो पावली करतो. का करतो माहित नाही. सर्व प्रश्न सारखे, वेदना सारख्या यातीहिन पणा ब्राम्हण व मराठा समाजाने सारखाच दिलेला तरी सुद्धा आम्ही पडताळणी करतो. पण एखादा मोठा होण्यासाठी हुकमत गाजविण्यासाठी कवेत घेण्यासाठी गुलामी देण्यासाठी गोडबोलून समोर आल. आपन तेली आहोत म्हंटला की आम्ही समाजाची उंची आमचे आम्ही वावरतो. गडांगळ्या बसल्या तरी आम्ही आमच्या पडतळणीचे यशोगीत गातो आमच्या पडताळणीचा केंद्र बिंदू तो महान समाज बांधव आहे. त्यांची आमची जात एक म्हणताच जात अभीमानी झोकून सलाम करतील हे आमचे दिवसा पडलेले स्वप्न. आता ते पुर्ण होत नाही. कारण आमची पडताळणी आम्हालाच माहित तर ही झाली आपली आपल्या गावातील गल्लीतील आळीतील आपलीच आपन केलेली पडताळणी अशी एक दुसरी पडताळणी आहे. त्यात आम्ही कुठे आहोत याचा शोध घेऊ या ?