पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 2 )
ज्या ठिकाणी यशाचे रस्ते असतात. ज्या ठिकाणी आपल्या पुर्वजांनी संघर्ष करून इतिहास घडविला. ज्या ठिकाणी आपली स्फुर्ती केंद्रे असतात. या ठिकाणाची आपली पडताळणी पहावयाची असेल तर एक उदहरण देऊन पुढे पाहू. संत तुकाराम संत संताजींनी आपल्या जातींची स्वत: पडताळणी केली होती. ती केली होती म्हणून हीन ठरवणार्या ब्राह्मण व क्षत्रीय जातींना ते ठणकावून सांगत होते. तुम्ही कसले रे उच्च जेथे भेदा भेद आसतो त्या ठिकाणी देवाची वस्ती नसते. जेथे श्रेष्ठत्वाचा फुकटचा अभिमान आसतो. तुमचे मोठे पण हे भुसा भरलेल्या बुजगावण्या सारखे आहे. अशी त्यांची पडताळणी केली. कायदे त्यांचे होते म्हणून ब्राह्मण्य जपणार्या मंडळींनी दावा दाखल केला. न्यायधीश कोणतर रामेश्वर भट आरोप करणारे कोण तर मंबाजी गोसावी, सालू मालू अप्पा गोसावी ही ब्राह्मण्याची अभिमानी मठाधीश मंडळी. इथे पडताळणी करून न्याय दिला. संत तुकाराम नावानिशी संपवण्याचा. सर्व जातींची पडताळणी करणारे संत संताजी यांनी त्यांचा कायदा पायाखाली तुडवून त्यांची जात पडताळणी केली. आम्ही पडताळणीत हुशार आहोत. आम्ही संघर्षात हुशार आहोत. आम्ही रणनीतीत हुशार आहोत. आम्ही फोडा फोडीत, जोडा, जोडीत आरोपांच मोहळ उठविण्यत मोठे आहोत. आमच्या सारखे कष्टाळू आम्ही. समाजपातळीवरचे एखादे पद चिकटविण्यासाठी. आम्ही आकाश पाताळ एक करतो. आता या पदाचा उपयोग समाजासाठी किती या पेक्षा माझी उंची समाजात वाढविण्यासाठी करतो. हारतुर्याचे मोठे पण आपले विश्व आसते. तरी ही आपली मंडळी समाजासाठी काय करतात ? कारण दुसर्या समाजात नावे ठेवण्या पेक्षा आपन आपली पडताळणी केली पाहिजे. संत संताजींनी अशी पडताळणी केली आसती.