पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 3 )
पाटलाने व ब्राह्मण समाजाने आपली पडताळणी केली आहे. या पडताळणीतून त्यांनी आपल्याला एक प्रमापत्र दिले. तुम्ही विर अहात, तुम्ही मोठे आहात. तुमचा शत्रू दूर नसतो तुमचा शत्रू तुमच्या जवळचाच आहे. जात मोठी करावयाची असेल तर तुमच्या जवळच्या रक्ताच्या भावकीच्या माणसात लढा ही लढाई सोपी आसते. या लढाईतून तुम्ही झटपट मोठे व्हाल. ही लढाई लढताना आमच्या नजरेच्या टापूत रहा. गुमान मत द्या. तुमच्या ओबीसी जागेवर आम्ही आहोत. नाहीतरी तुमचे पुर्वज कुठे गावचे मोकाशी होते. मोकाशी पण हा आमचा जन्म सिद्ध अधीकार आहे. हा बामणाच्या आमच्या नजेरच्या टापूतला कायदा आहे. तो तुम्ही मोउणार सुद्धा नाही. उलट तुमचे घटनेचे अधीकार आम्ही बळकावले म्हणून चौका चौकात, आळीत, गल्लो गल्ली. तुमच्याच घरावर तुम्ही तुमच्या पैशाने आमचे गावचे पाटील ओबीसी म्हणून निवडले म्हणून तुम्ही अभिनंदन ही कराल. ब्राह्मण समाज तर गावच्या पाटला पेक्षा हुशार निघाला याने केलेली पडताळणी तशी नंबर एक. सोशल मिडीयातील एक मजकुर त्यांनी व्हायरल केला. पोष्ट होती मी समाज मोठा केला. माझ्या नजरेच्या टापुत तेली समाज मी म्हणेन तो पदाधकारी मी म्हणेन ते सत्य. तर आश्या कारभार्याने एक पोष्ट टाकून आपली जात पडताळणी केली. त्या पोष्टचा आशय असा की मराठ्यांनी तुमचे पळवले. तरी मोर्चे काढतात. समाजाने विचार ही करू नये रस्त्यावर येण्याचा तर आशी बुद्धीजीव मंडळी आपल्यातील तयार करून किंवा हुडकून त्यांना मोठे केले जाते. ही आशी शहाणी मंडळी पोपटा सारखी बोलतात. रस्त्यावर समाजाने उतरू नये. आपल्या संस्कृतीचा तो अपमान आहे. आपला मान ब्राह्मण्याने जे शिकवले व सांगीतले तेवढेच करावे. आपली संस्कृती महान आहे. आपले रीती रिवाज महान आहेत. जन्मा पासून आम्ही दिलेले वृत्त, वैकल्य विधी प्रामाणीक पणे केली की तुमची जात पडताळणीत एक नंबरचे ठरली. आमच्या शब्दावर भरवसा आमच्या विचारावर वाटचाल म्हणजेच पडताळणीत यशस्वी पणा असणे या साठी आम्ही तुम्हाला तुमच्या हाजारो वर्षीच्या वंशजांचे दाखले देतो तुमचे पुर्वज जातीवंत होते. ते इतकी की आमच्या नजरेच्या टापूत होते हा तुमच्या जातीच्या दखला काय सांगतो तर तुम्ही जातीवंत आहात. आम्हा उच्चवर्णीयांच्या दिलेल्या हुकमाचे तुम्ही पाईक आहात असो. आपली जातीची पडताळणी या उच्च जातींनी केली आहे.आसे ब्राम्हणी पणाने प्रेरीत झालले स्वयंघोफीत समजाचे नेते सोशल मिडीयावर असे सांगून गेले. ही बाब परवा मी विभागीय जात पडताळणी ऑफीसच्या वरंड्यात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत उपस्थीत असताना जेजे पहिले ते डोक्यात येताच समोर आली संत संताजी यांनी काय केले ? आणी आम्ही नेमके काय करित आहोत याचे चित्र समोर आले.