पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 5 )
जात पडताळणी ऑफीस समोर ग्रा. पं. सदस्य जि. प. सदस्य महा नगर पालिका सदस्य एकटे किंवा दोन तिन कार्यकर्त्या सह समोर येत होते. मी एकटाच पहात होतो एैकत होतो. फाईल कशी बनवावी आपल्या निवडीला ऑबजेक्शन घेतले असेल तर वकील लगेच भेटत होते तुम्ही मराठा कुणबी कसे बनला याचेे मार्गदर्शन कोपर्यात नेहून दिले जात होते. ऑबजेक्शन घेतलेले फार थोडे होते. पण ज्यांच्या विरोधात मत नाही अशी बरीच मंडळी चौकशी समीतीकडे जात होती. आणी यांची चौकशी ही होत होती हिच मंडळी पुन्हा प्रमाण पत्र मिळविण्यासाठी हेलपाटे मारून मिळवत होती. काही अंधारात ही हात सैल सोडून आले हळू सांगत होते. आणी जातीवंत मराठे हे ओबीसी जातीचे कुणबी प्रमाणपत्र घऊन आनंदाने जात होते. आणि आम्ही आमचीच पडताळणी करतोय आरे आपल्यात श्रेष्ठ मी कसा ? आणी ब्राह्मण, मराठ्यांच्या गुलामीला सलाम ठोकला असतो.
जय संताजी