राजुर - अकोले तालुका तैलिक महासभेने 10 वी 12 वी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा व जेष्ठ नागरीकांंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या अ. नगर उत्तर म. तैलिक सभेचे उपअध्यक्ष श्री. सोमनाथ बनसोडे सर यांचा वाढदिवस ही होता. या वेळी उपाध्यक्ष यांचा वाढदिवसा निमित्त 1 ली ते 12 वी पर्यंत 92 समाजातील 13 आदिवासी विद्यार्थींना शालेय साहित्य वाढदिवस निमित्त वाटप करण्यात आले. यावेळी नगर जिल्हा स्तरावरील मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमास डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, मंडळी शेतकरी आशा स्तरांवरील बांधव उपस्थीत होते. अकोले तालुक्यात प्रथमच असा मेळावा व श्री. बनसोडे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी उपस्थीत पदाधीकार्यांनी संघटन व एकी याचे महत्व सांगीतले शेवटी बनसोडे सर यांनी सांगीतले. नुसते वाढदिवस साजरे न करता या निमित्ताने समाजाचे संघटन व समाज उपयोगी उपक्रम राबवून समाज बलवान करावा.