पुणे :- ओ.बी.सी. सेवा संघ ही अराजकीय संघटना बनावट ओबीसी बाबत, जागृती रस्त्यावरची लढाई, कोर्टातील लढाई लढत आहे. परंतू भाजपा व रा. काँग्रेसचे जे ओबीसी सेल आहेत त्यांचे अध्यक्ष अनुक्रमे श्री. जिवय चौधरी व श्री. ईश्वर बाळबुधे हे तेली समाजाचे आहेत. त्यांच्या निवडीचे अभिनंदन ही आम्ही केले होते. पण आज वस्तुस्थिती आशी आहे 96 कुळी मराठा ग्रा. पं. ते जिलह परिषद, नगरपलिका व महानगर पालीका मध्ये बनावट कुणबी प्रमाणपत्रावर निवडून आलेत. जात पडताळणी करणार्या समीतीत एक तर खरा ओबीसी अभावाने या समितीवर शासन कर्त्या मंडळींचा फार मोठा दबाव. आज आपल्या हक्काच्याअरक्षणा पासून दूर फेकणारी धनदांडगी व जात दांडगी मंडळी जी मंडळी आहेत. त्यांच्या समोर ही ओबीसी सेल बुजगावणे आसते. एवढी वास्तवता समोर येत आहे. रा. काँग्रेसच्या बाळबुधे यांना प्रश्न केला ओबीसी सेवा संघाच्या श्री. योगेश ढगे यांनी मराठा कुणब्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेस ची भुमीका काय ? बाळबोधे म्हणाले. हे वरून होत नाही खालच्या स्तारवर होत आसते. परंतू वास्तव ते लपवत होते. यांच पवार घराण्याने मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी शासन यंत्रणा तेव्हां कामास लावली. एक नंबर होण्यासाठी तेली, माळी, सुतार, लोहार, कंभार आशा जातींचा बळी घेतला म्हणुन ब्राम्हण वर्चस्व असलेल्या भाजपाला सोबत ओबीसींनी दिली. आज काय आहे याच भाजापाच्या तिकीटावर हजारो बोगस ओबीसी निवडून आलेत.
मा. विजय चौधरी नंदूरबार हे भाजपाच्या ओबीसी सेल चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठा कुणब्या विरोधात बोलले माहित नाही. जर आवाज उमटवत असतील तर अभिनंदन. त्यांचा आयकॉन तर्फे जाहिर सत्कार झाला तेंव्हा मिडीयावर वाचले लगेच अभिनंदन ही केले. परंतू जेंव्हा त्यांचा जाहिर सत्कार झाला तेंव्हा सत्य समोर आले, पुणे, चिंचवड महानगरपालिका, जि. प. व पं. सं. मध्ये जे बोगस ओबीसी निवडून आलेत त्यांच्या विरोधात ओबीसी संघटना कायदेशीर व प्रशासनीक लढाया लढत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये महापौर हे 96 कुळी मराठा आहेत. समितीने मान्यता दिली. या बाबत कोर्टात रितसर लढाई संघटना लढत आहे. परंतू याच परिसरात श्री. विजय चौधरी यांचा सत्कार होता. तो सुद्धा महापौर ज्या आमदारांच्या मुळे खुर्चीवर बसलेत ज्या भाजपाने आपले 18 बोगस नगरसेवक निवडुण आणलेत त्याच्या सुत्रधाराच्या हास्ते सत्कार होतो. ते बोगस महापौराचे कौतुक करतात. त्यांच्याशी विचारना केली श्री. चौधरी म्हणाले मला अंधारात ठेवले होते. यातून कोणता संदेश जातो. ओबीसींना खच्चीकरणाचा राष्ट्रवादी (मराठावादी) काँग्रेसचा रस्ता भाजपानें रूंदवालेला आहे. आपन 96 कुळी ओबीसी अहात तेंव्हा ही अपेक्षा नव्हती. आम्हाला साथ द्या खर्या ओबीसी सोबत उभे रहा. ही अपेक्षा ओबीसी सेवा संघा तर्फे सर्वश्री प्रदिप ढोबळे, मोहन देशमाने, दिगंबर लोहार, महेंद्र धावडे, योगेश ढगे, रमेश भोज, पाषाणकर व खर्या ओबीसी साठी लढणारे श्री. मृणाल ढोले पाटील यांनी व्यक्त केली आहे.