पुणे :- पुणे समाजाचे माजी अध्यक्ष कै. नंदू क्षिरसागर यांचे बंधू नाना म्हणजे एक गोरगरीबांचे कैवारी होते. दुर्लक्षित कामगारांना संघटित करून रस्तयावर उतरून न्याय मिळवून देणोर नाना होते. पुणे शहरातील रिक्क्षा चालविणार्यांचे ते नेते होते. महाराष्ट्र रिक्क्षा सेना या संघटनेद्वारे त्यांनी आंदोलने केली व त्यांना न्याय मिळवून दिला आहे. महाराष्ट्रात व पुणे शहरात आज शिवसेना मुळे पकडुन आहे. परंतु त्यांचे मामा कै. व्हावळ यांनी आगदी सुरूवातीस बाळासाहेब ठाकरे यांना सोबत दिली होती. नानांचे मोठे बंधु नंदू क्षिरसागर हे पुणे शहरात शिवसेना रूजवणारे होते हे वास्तव आहे. चळवळ्या नानांना जे पटले नाही आणि ज्यात गरिबावर अन्याय होतोय म्हणताच ते रस्त्यावर उतरले. असा गरिबांचा कैवारी राजकीय पक्षांना नको आसतो. आणी प्रत्येक राजकीय पक्ष हे सुरूवातीला उभे रहाताना आपला उपयोग करतात. नंतर सत्ता जवळ येताच मराठा, ब्राह्मण जवळचे वाटतात ही होरपळ नानांनी अनुभवली. तरी सुद्धा कै. नांनानी विविध पुरोगामी संघटने तर्फे सन 2014 ची लोकसभा निवडणूक लढवुण. पुरोगामी पुण्यात आपला ठसा उमटविला कै. नाना क्षिरसागर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.