घोटी : डीजे, डॉल्बी, तसेच वाद्य संस्कृतीला फाटा देत गणेश विसर्जन सोहळ्यात येथील श्री. संताजी महाराज मित्रमंडळ व तेली समाज बांधवांनी अभिनव उपक्रम राबविला. वारकरी दिंडी काढून हरिनामाचा व गणरायाचा गजर करित, तसेच महिला वर्गाने प्रबोधन रॅली काढत सहभाग नोंदवला, घोटी शहरात वर्षभर श्री संताजी मंडळाकडून व समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविले जातात. गणेश विसर्जन मिरवणुकीत तेली समाज बांधव, महिला व युवतींनी उत्स्ृर्तपणे सहभाग घेऊन उपक्रमाला प्रतिसाद दिला.
संताजी मंडळाच्या युवकांनी भजनी मंडळाच्या सहकार्याने अभंग, कीर्तन ओव्या, गात टाळ मृर्दृगाच्या तालात वारकरी दिंडी काढण्यात आली. अभंगाचा ताल धरत नाचत, बागडत या युवकांनी दिंडीची शोभा वाढविली, तसेच युवती व महिलांनीही हाती बेटी बचाव, बेटी पढाव पर्यावराणाचे संतुलन राखा आदी फलक घेऊन प्रबोधन केले. या मिरवधूकीत भजन तंढळ, संताजी युवक मंडळ, समाजबांधव व भाविक सहभागी झाले होते. ही दिंडी व गणेश विसर्जन मिरवणूक संताजीनगर, घोटी मेन रोड बाजार, भंडारदरा रोउ मार्गे नदीवर नेण्यात आली व गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.