पेठ येथे श्रीकृष्णांनी वेधले लक्ष
पेठ नाशिक तेली समाज - हरसूल व पेठ येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
संताजी महाराज यामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण बापू महाराज गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भाविकांकडून करण्यात आले. सायंकाळी संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या प्रतिमेची सजवलेल्या महान आतून टाळमृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी ज्ञानेश्वरी ग्रंथ कलश तुळशीवृंदावन भगवा झेंडा घातलेल्या व फेटा मानलेल्या तरुणी तसेच भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा केलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चौकाचौकात गृहिणींनी त्यांची अौक्षण केले.
ननाचलोंडी येथील सितारामबाबा चौधरी व पांडू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील वारकरी संप्रदाय व संताजी मंडळ हरसुल संताजी पालखी मिरवणूक यामध्ये सहभागी झाले.
सात दिवस सुरू असणाऱ्या संताजी पुण्यतिथी सोहळ्याच्या संध्याकाळी दीपोत्सव बापू बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आला व माधव दास महाराज राखी यांच्या कीर्तनाने संताजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
हरसूल येथे तसेच पेठ शहर व परिसरात श्री संत संताजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शहरातून मिळून काढण्यात आली. म्हणून तिच्या वाटेवर सडा रांगोळ्यांनी अंगण सजवण्यात आली होती