चाकण :- श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दर वर्षी मोठ्या प्रमाणात तेली समाज बांधव सुदूंबरे येथे येतात. या वर्षी २० डिसेंबर २०१४ रोजी श्री. संताजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांचे बंधु मा. श्री. सोमभाई मोदी हे संताजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने सुदूंबरे पुणे येथे आले होते. त्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
भारत देश हा ऋषिमुनींचा देश आहे. भगवे वस्त्र धारण केले म्हणुन कोणीही संत बनत नाही. संताच्या विचरांचा मार्ग अवलंबुन समाज कार्य करावे. युवकांनी नशा करण्यापासून दूर रहावे. वाहातुक नियमांचे पालन करावे. संताजी महाराजांचे कार्य महान आहे. संतांनी समाजपरिवर्तनासाठी आयुष्य केले. त्यांच्या व आपल्या आशिर्वादाने माझे बंधु मा. नरेंद्र मोदी देशांचे पंतप्रधान झाले, ही गैरवशाली गोष्ट आहे. त्यांनी भारत स्वच्छतेचा नारा दिला. मात्र स्वच्छतेसारखी क्षुल्लक बाब आसुनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. या स्वच्छता अभियानात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू व गुजरात तेली समजाचे अध्यक्ष श्री. सोमाभाई मोदी यांनी केले.
त्यांच्या समवेत राजमोहन मोदी सामाजिक कार्यकर्ते हे ही उपस्थित होते. उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश जगनाडे उद्घाटक श्री. शैलेश मखामले, संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे, खजिनदार श्री. राजु घाटकर कार्याध्यक्ष श्री. विजय रत्नपारखी शिक्षण शिक्षण समितीचे चिटणीस श्री. बाळासोहेब शेलार, श्री. दिलीप चिलेकर, श्री. भिकाजी भोज, श्री. घनश्याम वाळुंजकर, श्री. चंद्रकांत वाव्हळ,श्री. भागवत व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.
उत्सवानिमित्ताने सुदुंबरे येथे सात दिवस सप्ताहाचे आयोजन केले होते. किर्तन, अखंड हरिनाम, पारायण, भजन जागर इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्याची सुरूवात सुदुंबर्याच्या सरपंच संगिता बांगे व उपसरपंच श्री. बाळासाहेब गाडे यांच्या हास्ते झाली. तसेच शिक्षण समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला हेाता. ५० विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात आली. कु. रसिका सतीश कर्डिले हिला १० वी मध्ये ९६ गुण मिळाल्याने त्या विद्यार्थीनीचा विशेष गौरव करण्यात आला. सदरची विद्यार्थी १० वीच्या परिक्षेत जुन्नर तालुक्यात प्रथम आली. विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचे नियोजन शिक्षण समितीचे चिटणीस श्री. बाळासाहेब शेलार यांनी केले.