
सुदुंबरे - श्री. संत संताजी समाधी मंदिरातील दान पेटी चोरट्यांनी पळवुन नेहली आहे. येथे शाळा आहे. संस्थेचे कर्मचारी आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे हे एक अधीष्ठान आहे. कोट्यावधी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. असे असतानाही येथे चोरी होऊन दहा दिवस उलटले तरी पोलिस यंत्रणा केस नोंदवून घेण्या पलिकडे काहीच करीत नाही. ही बाब येथे समोर येते. संस्थेचे अध्यक्ष बदलून चार महिने झालेत. नविन अध्यक्षांना ही कल्पना दिली गेली नाही. ते स्वत: या दहा दिवसात सुदूंबरे येथे गेले होते. कर्मचारी या बाबत ही उदासिन दिसले. परंतु मावळते अध्यक्ष श्री. जनार्दन शेठ जगनाडे व श्री. घाटकर खजिनदार यांनी पोलिस स्टेशना रितसर तक्रारार दाखल करून ही पोलिस यंत्रणा काहीच हालचाल करित नाही. ही बाब तेवढीच खेदजनक आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade