प्रतिमा एकाएकी घडत नाही. जनमानसात तर नाहीच जनमाणसं ही झगमगटा पासून दूर असतात. तो शांत आसतो तो झोपी गेलेला ही वाटतो. पण खरा जागा, खरा सावध तोच आसतो त्यांच्या अंतकरणात सत्य असत्याचा झगडा चालू असतो. याच झगड्यातून तो सत्य जाणून घेतो. आणी अशा या जाणलेल्या पणाला जाणता म्हणतो. वर्द्या येथील खासदार रामदास तडस यांना हे जाणते पण सर्व सामान्यांनी दिले आहे. हा सामान्य माणूस इतका हुशार असतो की आपले पण तो सहज देत नाही. त्यासाठी दिर्घ परंपरा शोधत. वाटचाल तपासतो कामाची ठेवण बघतो आणी मग तो साठवण करतो. तर ही साठवण सांगते तडस साहेबांनी प्रदिर्घ अशी वाटचाल केली व ती केली म्हणुन ती त्यांना प्रगती मिळाली आहे.
मी आमदार होतो. मी खासदार आहे . मी संसदेचा एक घटक आहे. सत्ताधारी पक्षाचा मी एक म्होरका आहे. तुमचा माझा संबंध हा फक्त एक दिवसाचा आहे. ही अखिव रेखीव भूमीका त्यांनी प्रथम पासुन स्विकारली नाही मी तुमचाच आहे हे कृतीतून सिद्ध केले. सत्तेत वावरणारे तडस कधी ही भेटतात. भेटीत मन मोकळे बोलतात. भेटीत प्रश्न समजुन घेतात. ते तडीस लावण्या साठी स्वत: संबंधीतांना फोन करतील. आगदी गाव कामगार तलाठ्या पासुन ते कलेक्टर पर्यंत या धडपडीत समस्या सोडवतील. सामान्य माणसाला या पेक्षा अधीक काय पाहिजे. पण हेच ते आपले पणाने करतात हे त्यांचे वैशीष्ठ समस्या दोन असतात एक स्व:ताची व एक सामुदाईक या सामुदाईक मध्ये ते अग्रहनी रहातात आणी सर्व समावेक्षक निर्णय घेतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावलेली आहे. दळवळण साठी ना. गडकरी साहेबांच्या कडे प्रश्न सोडवले जातात. डांबरी करण, रस्त्यांचे रूंदीकरण, ओव्हर ब्रीज या साठी धडपड करून निधी उपलब्ध केला यातून काही कामे प्रगती पथावर आहेत. काही मंजूर होत आहेत. महात्मा गांधींच्या 11 वर्षाच्या वास्तव्याने विनोबा भावेंच्या त्यागाने वर्धाला व लगतच्या सेवा ग्रामला जागतीक स्वरूप आले आहे. या देशाच्या इतिहासाची ही भूमी आहे. या सेवा ग्रामला वेगळे रूप देण्याची ही साठवण अधीक होण्यासाठी ते शासनाकडे पाठ पुरावा करून निधी उपलब्ध करीत आहे. पुलगावच्या रेल्वेचे ब्रॉडगेज रूपाांतर साठी त्यांनी 1000 कोटीचा निधी आणला त्याचे काम काज ही सुरू आहे. वैयक्तीक व सामुदाईक समस्या समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी मुळा पर्यंत जातात. याच मुळे भाजपा या पक्षात ते एक कामाचा माणुस ही प्रतिमा निर्माण करू शकले. कामावर निष्ठा असल्यानेे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातले तयार झाले आहेत. मुद्दे सुद्द मांडणी व त्यावर ठाम भुमीका या मुळे मोदी साहेबांचे जे कामाचे खासदार आहेत त्यात यांचा समावेश होतो . तसे पाहिले तर राजकारणाची परंपरा पाठी मागे नाही. एक सामान्य कुटूंबातील असल्या कारणाने उमेदीच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समीती सदस्य होण्यापासून आज पर्यंत संघर्ष ही करावा लागला. हा संघर्ष करीताना बरोबर फक्त कार्यकर्ते होते आर्थीक पाठबळ साठी जे विवीध रस्ते जवळ असावे लागतात ते त्यांनी जाणीव पुर्वक निर्माण केले नाहीत. निर्माण केले कार्यकर्ते. हीच यांची शिदोरी म्हंटली पाहिजे. त्यांनी भाजपात गत दहा वर्षांत काम सरु केले. जसे पक्षात राजकीय गट आसतात हा माझा हा तुझा हा भेद त्यांनी केला नाही. आपला गट बनविला नाही. त्यामुळे पक्षाच्या विचाराला तो आपला पक्षीय विचारावर वाटचाल करीत असताना पक्ष पातळीवर ते सर्वांचेच असतात. काम करताना विरोधी पक्षातील मंडळींना ही ते आपले वाटतात कारण विकास साधताना विरोधक ही आपला आहे. निवडणूकीतली रणनिती फक्त त्या काळापुरती ही त्यांची वाटचाल त्यांना एक जाणता खासदार या पदावर घेऊन जाते. हे त्यांचे वैशिष्ठ सर्व मान्य करतात कुठेच टोकाची भुमीका न घेणे ही रित ठेवली आहे. यातुन वातावरण बिघडू शकत नाही तर शांत होऊन कटुता जाऊन मार्ग निघू शकतो खासदार तडस साहेब हेे चार वेळा विदर्भ केसरी म्हणुन विजय झालेत पैलवान की हा पिंड तरी आगदी राग आला, आगदी संघर्षाची वेळ आली तरी ते शांत बसतील पण भाषेवर नियंत्रण ठेवून ते पातळी सोडणार नाहीत. हे वैशिष्ठ त्यांच्या बाबत मान्य करावे लागते. ते चार वेळा विदर्भ केसरी होते. खेळ हा त्यांचा केंद्र बिंदू. कुस्ती साठी त्यांनी आमदार असताना सलग 12 वर्ष आपला आमदार फंड दिला अनेक पैलवानांना सहकार्य केले. कुस्त्यांच्या फडाला सहकार्य केले. नुसती कुस्तीच नव्हे तर युवकात खेळाची जिद्द निर्माण व्हावी यासाठी त्यांनी सहकार्य ही केले. त्यामुळे खेळाडूंची मालीका निर्माण झाली. पुरूषांनी कुस्ती खेळावी आसे नव्हे. महिलांनी या प्रांतात नाव लौकिक मिळवावा या साठी ते राज्य पातळीवर महिला कुस्ती स्पर्धा थोंड्या काळात आयोजित करीत आहेत.
महाराष्ट्रात तेली समाज 10 टक्के आहे परंतु वस्तुस्थीती आशी आहे. तेली समाजा सारख्या ज्या जमाती आहेत त्या राजकारणा पासुन दुर असतात. सहसा या जाती मधील राजकीय मंडळी जातीचे नाव दूर ठेवतात आणी राजकारणात वावरतात पंरतू तडस साहेबांचे तसे नाही. मी विधान परिषदेचा 12 वर्ष आमदार होतो तेच एक तेली मतावर. 1995 मध्ये महाराष्ट्र पातळीर त्यांना समाजाचे अध्यक्ष पद मिळाले. सक्रिय राजकारणात ते ठाम पणे उभे रहातात मी एक तेली आहे. तुम्हा सर्वांच्या विकासा बरोबर तेली समाजाचा विकास साधने हेे माझे कर्तव्य समजतो. ही स्पष्ट भुमीका त्यांनी स्वीकारली त्यामुळे समाजातील अनेकांना ते आधार झाले संत संताजी यांच्या समाधी स्थळी 2013 मध्ये पहिला मेळावा यशस्वी करणारे तडस साहेबच आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात ते मा. जयदत्त क्षिरसागर यांच्या बरोबर धडपडत होते. लोकसंख्या 10 टक्के तर या समाजाच्या विकासाचा वाटा हा दहा टक्के मिळावा ग्रा. पं. त लोेकसभा पर्यंत आम्हाला या प्रमाणात संधी मिळावी. शैक्षणीक सवलती मिळाव्यात उद्योग व्यवसायात अर्थीक सहकार्य मिळावे या साठी ते संघटनेच्या माध्यमातुन धडपडतात. सन 1995 मध्ये विदर्भा पुरती मर्यादित असलली समाज संघटना त्यांनी महाराष्ट्रत उभी केली. यासाठी चांदा ते बांधा पर्यंत फिरले या फिरण्यामुळे संघटन तर झालेच उलट काही गोंडस फळे समाजाला मिळाली आहेत.
खासदार रामदास तडस साहेबाकडे पहिल्या नंतर एक बाब समोर येते. मी आमदार होतो किंवा आज मी खासदार आहे ही खासदारकी ही सत्ता डोक्यात भिनली की सामान्य हे दूर जतात. मी खासदार असलो तरी समान्यांचा एक अविभज्य भाग आहे. तुम्ही तुमचा माणुस म्हणुन मला पाठविलेत तेंव्हा मी वेगळा नाही. ही भुमीका त्यांना जगण्यात आनंद वाटतो. अनेक जाती ह्या हेतु पुरस्कृत राजकारणा पासून, सत्ता केंद्रा पासून दूर ठेवल्या होत्या. आशा जाती त्यांनी शोधल्या त्यांना राजकीय जमात बनविले यातुन अनेक सत्तेत गेले व राजकीय कार्य पद्धीत यशस्वी झाले. त्यामुळे काम करणार्या मंडळींची एक फळी निर्माण करू शकले ही घडलेली मंडळी हीच तडस साहेबांची शक्ती आहे. अशी हाजारो कुटूंबे आहेत त्यांना आज ही खासदार तडस हे खासदर ही वेगळी व्यक्ती वाटत नाही तर आपले कार्यकर्ते वाटतात.
माणुस पण जपणारे खासदार रामदास तडस यांचा एक एप्रिल हा वाढदिवस त्यांना श्रमीक पत्रकार संघ वर्धा या संघटनेचा अध्यक्ष म्हणुन व दै. सकाळ तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.