आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे - चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा
वृत्तीने पैलवान एक खेळाडू तिन विदर्भ केसरी पद मिळवलेले खेळ हा पिंड जोपासलेला. या तांबड्या मातीत शिकले यश मिळवता येते पण पहिले अपयश मिळवले पाहिजे. हे अपयश पचवता आले पाहिजे या अपयशातुन बरेच शिकता आले पाहिजे. यश हवे असेल तर या जोडीला आपल्या माणसाचा विश्वास ही शिदोरी मिळवता आली पाहिजे. ती मिळवली खा. तडस साहेबांनी त्यांच्या वाटचाली कडे पाहिले तर एक ठळक गोष्ट नजरे आड करता येत नाही मुळात तडस हे घराणे यवतमाळ मधील खेडगावातील या खेडेगावात त्यांच्या वडीलाकडे शेती होती. शेती हे जगण्याचे साधन होते. गाव खेडेगाव त्यात गावाचे वातावरण खराब होते. म्हणुन त्यांच्या वडीलांनी देवळी येथे शेती विकत घेऊन वडील देवळीला स्थीर झाले. याच देवळी गावात खा. रामदास तडस साहेबांचा जन्म झाला. वडील शेतकरी तांबड्या मातीत वावरणारे. हेच बळ त्यांना मिळाले. ते खिळाडू वृत्तीने वावरू लागले. राजकारणात बाजार समीतीचे सदस्य म्हणून सुरवात केली नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार खासदार या क्रमाने ते वाटचाल करू शकले.
पण या वाटचालीत ते मी तेली आहे. आणी माझ्या तेली समाजाला जागे करून संघटीत करणे हे माझे कर्तव्य आहे. ही त्यांची वाटचाल आम्हा कार्यकर्त्यांना प्राण वायु आहे. तो आम्हाला पुर्वी नव्हता. मी गाव पातळीवर समाज कार्यात शक्य ते करीत होतो माझा व्यवसाय संभाळून जो जो सहकार्य मागत असे त्यांना ते देत ही होतो. परंतू महाराष्ट्र तैलीक महा सभेने माझ्याकडे जबाबदारी दिली. काम करण्याची संधी दिली काम कसे करावे यांचे मार्गदर्शन दिले ते दिल्या मुळे माझ्या सहीत शेकडो कार्यकर्त्यांना नवी ओळख मिळाली. संघटनेच्या काम मुळे अनेक वेळा भेटता आले कामा विषयी चर्चा ही झाली यातून समोरच्या बांधवाला समजुन घेण्याची त्यांची माणसीकता फार मोठी आहे. चांगल्या कामा बद्दल शबासकी व काम करताना येणार्या अडचनी व चुका या बद्दल सविस्तर चर्चा करणे ही त्यांची वाटचाल आम्हाला काम करण्यास शक्ती देत आसते.
महाराष्ट्राचा दहा टक्के समाज एकत्र राहिला तर उद्याचा महाराष्ट्र आपला असेल ही त्यांची दिशा आहे. समाजात मते आहेत या मतात भेद करू नका. काम करताना गावपातळी वरचा बांधव आहे या कार्यकर्त्यांला पोषक वातावरण बनले पाहिजे ही त्यांची धडपड आसते हे सर्व जवळुन पहाता आले त्यांच्यातील एक दुसरा गुण ते माणुस वाचु शकतात त्या वाचलेल्या माणसाला जोडू शकतात समाज पातळीवरील नुसत्या संघटने पुरते नव्हे तर त्या मतदार संघात संघटनेत समाज बांधव म्हणुन मैत्री ठेवतात हा त्यांचा गुण स्विकारण्या सारखा आहे.
एक एप्रिल हा त्यांचा वाढदिवसा निमित्त मी माझ्या वाव्हळ कुटूंबा तर्फे आमच्या पुणे विभाग तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो.