संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.