पुणे तिळवण तेली समाजाच्या पंचवार्षिक
निवडणुकीत नमो नम: पॅनेलभरघोस मतांनी विजयी झाले. यामध्ये श्री. घनश्याम वाळुंजकर, श्री. दिलीप व्हावळ, श्री. प्रकाश करडिले, श्री. माउली व्हावळ, श्री. अशोक सोनवणे या माजी विश्वस्तांसह पुणे शहर विभागातून श्री. महेश (मुन्ना) भगत, श्री. दीपक पवार, हडपसर विभागातून श्री. प्रीतम केदारी, कोथरूड विभागातून श्री. रत्नाकर दळवी, श्री. अनिल घाटकर, श्री. दिलीप शिंदे, नगर रोड विभागातून श्री. प्रवीण बारमुख, अप्पर इंदिरानगर विभागातून श्री. सचिन नगिने, श्री. उमाकांत उबाळे, सिंहगड रोड विभागातून श्री. गणेस (मिलिंद) चव्हाण हे विश्वस्तपदी भरघोस मतांनी विजयी झाले.
दिवसभर सुरू असलेल्या धो धो पावसात मतदारांनी मिळेल वाहनाने येऊन मतांचा पाऊस पाडला. आजचा विजय हा आमचा नसून जनतेचा विजय असल्याचे प्रतिपादन नमो न: पॅनेलचे प्रमुख घन:शाम वाळुंजकर यांनी केले. नमो नम: पॅनेलच्या प्रचाराचा नारळ शिवदर्शन येथील महालक्षी मंदिरात अभिषेक करून मा. उपमहापौर आबा बागूल, प्रसिद्ध उद्योगपती मा. शिरीषजी पन्हाळे, मा. वसंतराव जाधव आणि राजेश शिंदे या मान्यवरांच्या शुभहस्ते वाढविण्यात आला. या पॅनेलमध्ये विशेष म्हणजे सर्व उपनगरांना समाविष्ट करून घेतल्याने हा विजय दणदणीत झाला. सर्वांना सामावून घेतल्याने पॅनेलप्रमुख घन:शाम वाळुंजकर, दिलीप व्हावळ आणि प्रकाश करडिले यांचे समाजातून कौतुक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी समाजातील अनेक मान्यवरांनी प्रयत्न केला. परंतु ही लोकशाही असल्याने आणि समाजाची सेवा करण्याची प्रत्येकाला तळमळ असल्याने ते शक्य झाले नाही. असो.
तसेच सर्व विभागांतील महिला कार्यकर्त्या व पुरुष कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केल्यानेच आम्ही यशस्वी झालो, असे मनोगत नवनिर्वाचित उमेदवारांनी केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रचाराच्या नियोजनात सर्व विभागांतील ज्येष्ठ आणि कार्यकर्ते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये नगर रोडचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. शिवाजीराव ठोंबरे आणि अप्पर इंदिरानगर येथील गणेश चव्हाण या धडाडणार्या तोफांनी सर्व वातावरण ढवळून निघाले होते. तसेच सर्व विभागांतील महिला भगिनींचा व कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. आमच्यावर समाजाने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून निश्चितच समाजाची आधुनिक पद्धतीने प्रगती सर्व विश्वतांच्या कल्पकतेच्या माध्यमातून करू, असे प्रतिपादन सर्व नवनिर्वाचित विश्वस्तांनी केले.