आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.
1) कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पुर्णपणे नैसर्गिक व शास्त्रोक्त पद्धतीने तेली निर्माण केले जाते.
2) शुद्ध तेलाचा वास येतो कारण त्या तेलात 4 ते 5 प्रकारची प्रोटीन्स असतात, तो प्रोटीन्सचाच गंध असतो.
3) शुद्ध तेलाचा चिकटपणा खुप असतो. कारण त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे फॅटी अॅसिड असते, व्हिटॉमिन ई व मिनिरल्स सुद्धा असतात.
4) लाकडीघाण्यावरचे तेलच सर्वोत्तम. कारण तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो (म्हणजे या घाण्याचा आर पी एम. 14 आहे.) त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना तेलातील एकही नैसर्गिक घटक कमी होत नाही.
5) आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हाय डेन्सिटी लीपोप्रोटीन (एच डी एल) हा आपला लिव्हर मध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ले तरच तयार होतो, म्हणुन शुद्ध तेल खावे.
6) शुद्ध तेल खाल्याने शरीराला वात हा दोष संतुलित राहतो व त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत.
7) हार्डअॅटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरलिसिस, ब्रेन डॅमेज सारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.
8) भारतात शेकडो वर्षापासुन लाकडी घाण्यावरचे तेल खातात, त्यामुुळे 100 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.
9) लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान 40 अंश पेक्षा जास्त होत नाही त्यामुळे त्यातील कोणताही नैैसर्गिक घटक नष्ट होत नाही. आपल्याला ते सर्व घटक मिळतात की ज्या घटकांची गरज आपल्या शरीराला असते.
जय संताजी