सांस्कृतीक, सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात या समाजाने प्रबोधनाचा वसा स्विकारून रचनात्मक संघर्ष केला याचा आलेला अनुभव म्हणजे ग्रामिण भागात संपन्न झालेला हा आजचा सोहळा हे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही| कार्यकर्ते निर्माण करणे. त्यांना व्यापार, शेती या रोजच्या कामातुन दुर करून खानेसुमारीचे रचनात्क कार्य करणे हे शक्य झाले. ते मुळात या तालुक्याचे सुपुत्र श्री. चंद्रकातशेठ वाव्हळ यांच्या नेतृत्वा मुळे. सर्वांनी दिशा देणारे चुकेल त्याला संधी देऊन घडविणारे हे चंद्रकांतशेठ म्हणजे आमच्या सामाजीक जीवनाचे शिल्पकार हात ही प्रतिक्रिया या तालुक्यातील काही सहकार्यांनी व्यक्त केली.
शिवणेरीच्या कुशीत वसलेला हा भाग डोंगर दर्यांचा जुन्नर हे तालुका येथिल तेली बुधवार पेठ, सराई पेठ ही समाजाच्या हाक्काची बाजारपेठ शिवकाळा पुर्वी पासुन समाजाने जोपासलेली व वाढवलेली. तेली बुधवार पेठेत समाज वास्तु त्याची साक्ष देते. समाजाच्या आचार, विचार व कृतीचवे हे एक जुने ठिकाण अशाच पद्धतीने नारायणगांव येथे समाजाचे शनी मंदिर व समाजवास्तु येथे ही नियमीत समाज प्रक्रिया सुरू आसते. आळे या गावाला एैतिहासिक परंपरा. संत ज्ञानेश्वरांच्या मुळे इथे इतिहास घडलेला. या ठिकाणी नुकतेच भव्य शनी मंदिर उभे राहण्यास समाजाचा सिंहाचा वाटा ओतुर येथेल आपली पक्कड घट ठेवलेली समाजाची संस्था. जुन्नरच्या विकासात नगर पालीके द्वार, कर्डीले व कर्पे मंडळीचा सहभाग सातत्याने नगरसेवक पद समाजाकडे ठेवण्यात सहभाग नारायण गावात ही याचीच पचिती येते इथे सहकार्यतील पतसंस्थे द्वारे अनेक बाबत इतिहास घडविला. आळे येथिल ज्ञानराज पतसंस्था उभारणीत समाज सहभाग जवळ जवळ सर्व सदस्य समाजाचेचे असतात. हे ही सत्य आहे. आरक्षण अस्तीवात नव्हते तेंव्हा ही श्री रामदास वाव्हळ सरपंच होते. ही समाजाची बैठक नोंद ठेवावी आशी. या देशाचे स्वातंत्र्य येताच शिक्षणाची धडपड घेऊन या परिसरात पहिले इंजीनिअर झालेले श्री. रामदास पन्हाळे याच मातीतले. आज पुण्यात एक यशस्वी उद्योजक म्हणुन नावा रूपास आलेले हे बांधव आहेत.
श्री. चंद्रकांतशेठ जिल्हा अध्यक्ष होताच त्यांनी कार्य करू शकणार्या मंडळींची एक फळी निर्माण केली. सर्वश्री उल्हासशेठ वालझाडे वसंतराव कर्डीले, सतीष दळवी, अनिल कृष्णाजी शेलार उमेश शिंदे सोमनाथ काळे, राजेंद्र पन्हाळे देविदास भोत, विलास काळे, विलास वाव्हळ, नितीनशेठ पन्हाळे, अमोल शिंदे, अनिल वालझाडे संजय करपे, विष्णु दळवी, गणेश वाघचौरी संजय काळे, दत्तात्रय कर्डीले, संजय दिवटे शांताराम वाव्हळ, शिवाजी वाव्हळ, सौ सुनिता वाव्हळ महिला आघाडी अध्यक्षा सौ. संगीता वाव्हळ सौ. अनिता दिवटे, सौ. कल्पना वाव्हळ या सर्वांच्या बरोबर शुन्यातुन व्यापार क्षैत्रात नाव कमविणारे श्री. भरत कर्डिले या सर्व मंडळींनी कामाची जबाबदारी स्विकारली सह्याद्रीच्या कुशीत समाजाचे एकच घर रस्ता अडचनीचा पण त्या घराची नोंद ठेवण्यास ४ ते ५ वेळा जाणारे कार्यकर्ते ही जमेची बाजु या सर्व कार्यात बरेच शिकता आले हि नोंद ठेवावी अशीबाब.