श्री. आबा बागुल व माझे जुने नाते. योगा योग असा त्यांचे बालपण मामाच्या गावाला गेलेले. त्याच राजगुरू नगर परिसरात माझे बालपण गेले. संस्काराची शिदोरी इथेच मिळालेली माझे वडील स्वातंत्र्य सेनानी ल. वी. शिंदे यांनी याच परिसरात स्वातंत्र्याच्या रण संग्रामात भाग घेतला होता. याच परिसरात श्री. आबा लहानाचे मोठे कष्ट करून झाले. विडलांच्या निधना नंतर आईने व लहान मुलांना गरिबी आली म्हणून लाजू नका व श्रीमंती आली म्हणून माजू नका हा मंत्र दिला. तो त्यांनी आज पर्यंत जीवनात अंगीकारला आहे. ते पुण्यात आल्या नंतर कात्रज येथे भाड्याच्या खोलीत रहात होते. फॅब्रीकेशनचा अनुभव घेतला. व ते स्वतंत्र पणे काम करू लागले. इंडस्ट्री इस्टेट ही भापकर पंपाजवळ तेंव्हा पुण्याची शान होती तेथे ते उल्हास फेब्रीकेशनचा उद्योग करीत होते. शिवदर्शन गणेश मंडळाचे अध्यक्ष झाले. संघटन, नेतृत्व व लोक कलेची जान असलेले आबा शिवदर्शन वसाहतीने आपले केले हे त्यांना समजले नाही. आगदी 1992 चा उमेदवारी अर्ज ही सोबत्यांनी भरला. फॉर्म फी सहीत. आणी दांडग्यांच्या विरोधात उभे राहुन ते विजयी झाले.
यावेळी 1992 मध्ये स्वा. से. ल. वि. शिंदे यांना निकला समजताच मला सांगीतले हा आपल्या कहाण्यांचा भाचा वडिलांनी श्री आबांना घरी बोलवले त्यांच्या सोबत अनेक प्रतिष्ठीत नगर सेवक होते. त्यांना आबांचा सत्कार करून पटकून दिले. हा तेली समाजाचा उगवता सर्य आहे. आबांना आपले माना हा सुर्य गरिबाच्या घरात पहिली आपली किरणे घेऊन जाईल आणी भविष्यात तेच सत्य ठरले आहे. हा गरिबांच्या विकासासाठी देश स्वतंत्र्य करण्यासाठी जीवन अर्पण करणार्या माझ्या वडील सारख्या अनेक सेनानींचे अर्शीवाद आबांच्या पाठीशी होते. आणी त्यांच्या मातोश्री कै. नलीताई बागुल यांची शुन्यातुन सुरू केलेेली धडपड कोणताच आधार नसताना मुले घडवीणे हे एक दिव्य आसते ते यांनी यशास्वी पणे पार पाडले आहे.
आबांच्या मुळे 2000 साली झालेला कुटूंब परिचय मेळावा आबांच्या मुळे पुणे महानगर पालिके तर्फे दिला जाणारा शासकीय श्री संत संताजी पुरस्कार ह्या बाबी आबांच्या समाजनिष्ठेची पोच पावती आहे. आबा माझ्या शिंदे परिवाराचे अविभाज्य भाग आहेत. ते उपमहापौर होते. परंतु भविष्य लिहीणार्याला ही ठवकावुण सांगणारे आबा की श्री लक्ष्मी मातेच्या आशिर्वादाने वाटचाल करणारे आबा. हे भविष्यात आमदार असले पाहिजे. तेली समाजाच्या ओबीसींच्या वेदना ह्या विधानसभेत मांडावयास जावेत. तमाम गोष्टीत समाजाला न्याय मिळावा ती ताकद आज तरी श्री. आबा बागुल यांच्यात आहे.
सर्वा बांधवा तर्फे पुणे समाजातर्फे, शिंदे कुटूंबीया तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.