शिरूर, तळेगाव ढमढेरे, पाबळ, शिक्रापुर, कवठे आसा व इतर १० ते १२ गावात समाज समाजाची १५० घरे वास्तव करणारी परंतु शेकडो वर्ष आपला परंपरेचा व्यवसाय करणारी मंडळी. तो व्यवसाय मोडकळीस येताच यातिल बरेच जण परिस्थीतीशी लढुन यशस्वी ही झाले बरेच जण लढतच आहेत.
या शहरात समाज वास्तु आहे. समाजाचे येथे हनुमान मंदिर असुन. पदरमोड करून किंवा दानशुर शोधुन सभा मंडपाचे काम सुरू केले. या वास्तुत व्यवसाय मार्गदर्शन शिबीर बरोबर सुंदूबरे येथिल समाज विकास अराखडा याची पहिली मिटींग येथेच संपन्न झाली. समाज संस्थे तर्फे हनुमान जयंती, संताजी उत्सव वर्गणी न घेता संस्थेतर्फे साजरा केला जातो. कायम निधीत दरवर्षी भर घातली जाते. या ठिकाणी असलेल्या नगर पालीकेत कै. एकनाथ शेजवळ हे नगरसेवक ही होते. आज सौ. संगिता दिपक शेजवळ या नगरसेविका असुन पाणी कमिटीच्या सभापती आहेत. शिरूर मध्ये श्री. संताजी बचत गटा तर्फे २ वर्ष कार्य किमान ५० हजार रूपये सहकार्य. लाखो रूपये वाटप श्री. संताजी महिला गटा तर्फे महिलांना आर्थिक सहकार्य. श्री. संपत लोखंडे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते कार्यरथ आहेत.
ही एक पुर्वीची मोठी बाजारपेठ, या बाजारपेठेत तेल व पेंड विकणारी व निर्माण करणारी मंडळी समाजाची होती. गावच्या शैक्षणिक कार्यात कै. बाळाशेठ शिंदे यांचा मोठा सहभाग होता. शैक्षणिक संस्थेच्या डायरेक्टर होते. त्यांचेच चिरंजीव श्री. सुरेंद्र शिंदे यांनी पुण्याच्या गुलटेकडी येथे नारळाचे होलसेल व्यपारी ही स्वत:ची ओळख पुणे जिल्ह्यात निर्माण केली आहे.
महाराष्ट्रात रत्नपारखी, डोंगरे, शेंबडे, पाबळकर जी घराणी पसरली आहेत. त्यांचे मुळ ठिकाण हे पाबळ. गुरूनाथ रत्नपारखी, किशोर तेली या मंडळींनी राजकारणात सरपंच पंचायत समिती सदस्य या पदावर काम ही केले. याच गावचे सुपूत्र श्री. विलास पाबळकर हे पिंपरी चिंचवड येथे कामगार म्हणुन आले. कामगार म्हणुन राबता राबत एक उद्योजक होण्याचे स्वप्न समोर ठेवले. या वेळी आलेल्या असंख्य अडचनीवर मात करण्यासाठी सौ. ललीता पाबळकर यांनी मोठे योगदान दिले. आज संत तुकाराम नगर मध्ये पतसंस्था व इतर माध्यमातुन गरजु व होतकरू महिलांच्या घराच्या त्या शिल्पकार झाल्यात सुदूंबरे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. विजय रत्नपारखी याच पाबळचे ते आपल्या मातीशी सुसंवाद साधुन आसतात. आज पुणे विभागाचे तेली महासभेचे अध्यक्ष आहेत. आळे ता. जुन्नर येथे होणार्या मेळाव्याचे मागर्दशक ही आहेत. श्री. किसनराव रत्नपारखी हे हडपसर येथे प्राचार्य आसुन रयत संस्थेचे डायरेक्टर आहेत.
या तालुक्यातील समाज संस्था कमी आणि पुन्हा विखुरलेला समाज या साठी खाने सुमारी करताना अनेक अडचणीला समोरे जावे लागले शिरूर तालुका अध्यक्ष श्री. गणपत लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिलीप शिंदे यंच्या नेतृत्वा खाली खालील मंडळी व इतर बांधव कार्यरथ होते. सर्वश्री अशोक कुमार तेली. विजय शेजवळ, शेखर शेजवळ, नामदेव बागुल राजेंद्र मचाले, प्रमोद पवार संजय लोखंडे, संजय तेली स्वप्निल पवार रामदास घाटकर, मनोज देशमाने दिपक रत्नपारखी, नितीन देशमाने, संतोष शेलार अशोक केदारी, कमलाकर रत्नपारखी अमोल काळे, बाळासाहेब काळे जेष्ठ बांधव, भाऊसाहेब शेजवळ बांधव महिला संघटीत व्हाव्यात त्यांचे प्रश्न सुटावेत असा वसा घेतलेल्या सौ. जयश्री देशमाने व इतर सर्व बांधवांचे सहकार्य मोलाचे.