पुणे जिल्ह्यातील डोंगर दर्यातील अंबेगाव हे पन्हाळे कुटूंबाचे मुळ गाव हे घराने जन्माने तेली पण गावात ठसा उमटवून होते. मी तेली आहे. मी यातीहिन आहे याची जाणीव कुठेच नव्हती गावातील देवळांना उजेडात ठेवण्याची जबाबदारी पन्हाळे कुटूंबावर होती जो देव सर्वांची संकटे दूर करतो. जो देव मानवांना प्रकाशमान करतो त्याच देवाला अंधारातुन प्रकाशात ठेवण्याचे काम पन्हाळ्यांच्या कडे होते. देवकीची जमीन ही पिड्यान पिड्या होती. याच गावात कै. कृष्णाजी खंडूजी पन्हाळे देवाला प्रकाशात ठेवत होते. कृष्णाजींना गावकरी कृष्णाजी पंत किंवा किसन म्हणत असत. त्यांना 1846 मध्ये रामचंद्र हा मुलगा झाला. कृष्णाजींच्या घरात गोकुळ नांदू लागले होते.गावतच अक्षर ओळख होऊ लागली. रामचंद्र हे 13-14 वर्षाचे असतानाच 1859 मध्ये वडील वारले. बागडण्याचे वय अनेक प्रश्न उभे होते. या वेळी रामचंद्रपंतांची मोठी बहिन ही ती काशीबा व्हावळ यांना दिली होती. हे कुटूंब पुण्यात आले. पण येथे येताच काही दिवसात आई वारली.
पन्हाळे कुटूंबाचे शिल्पकार रामचंद्र ग्रामिण भागातून पुण्यात आले. आई वडिल वारलेत. कवळे वय आशा वयात सर्व जाबाबदार्या अंगावर पडल्यात. पुण्याच्या कॅम्प परिसरात इंग्रजांची वसाहत याच वसाहतीत त्यांनी जुन्या फर्नीचर खरेदी व विक्रीचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण हिशोब ठेवण्या पुरतेच याच वयात त्यांनी जवळ भांडवल, अनुभव, पाठबळ, नसतानाही या व्यवसायात रामचंद्र शेठ ही जन मानसातील पदवी मिळवली. जीवनात अनेक चढ उतार अनुभवले व्यवसायीक व कौटूंबीक जीवनात अनेक यशाबरोबर संकटे ही आली. पण ते सर्वांना सावरून वावरत होते. त्यांच्या पत्नी कै. काशीबाई यांनी कष्ट उपसले. त्या काळी प्लेगची साथ भयंकर होती. ताप आला म्हणे पर्यंत माणुस दगावत होता. प्लेगच्या दहशती बरोबर इंग्रज अधीकारी दहशद माजवत होते. कै. किसन रामचंद्र पन्हाळे यांचे वय संस्कारक्षम होते. हा अत्याचार ते पहात होते. साधा ताप असला तरी ती मंडळी डांबून ठेवत जन माणसात दहशद पसरली होती. आशा वेळी 1896 चा प्लेग पुण्याला ग्रासत होता. याच काळात किसनशेट यांच्या आई यांना ताप आला जांघेत गाठ आली. ती गाठ कापली आणी दूसर्याच दिवशी रामचंद्र शेठ यांना ताप येऊन गाठ आली डॉक्टरांना चोरूण आणले. उपचार सुरू केले. यावेळी किसन शेठ व इतर भावांना राऊंताच्या घरी सुरक्षित ठेवले. तरी भयंकर घटना घडली. खेडूत म्हणुन आसर्याला आलेले एक कोवळे पोर आपल्या हिमतीने वैभव निर्माण करण्याचे रस्ते तयार करतात. उद्याचा कर्तुत्वाचा वारसा तयार करतात असे. हे रामचंद्र पन्हाळे प्लेगला बळी पडले. आईने आपले डोळे पुसले. मुलांना रडू दिले नाही. त्यांना जवळ घेऊन बसली. तोंडातून आवाज काढावा तर इंग्रज आलेच घरात. उलट घरातील खुर्चीच्या गोदामात प्रेत लपवून ठेवुन. नातलगांना बोलवले. हाताच्या बाटावर मोजता येतील तेवढेच नातलग आले. किसनशेठ पन्हाळे यांच्या सह सर्वजन वैभव सोडून हाडपसर येथील पाटलाच्या माळावर पाल ठोकुन राहिले. तिन दगडाच्या चुलीवर जेवन बनवुन उभे राहिले.
कै. किसन रामचंद्र पन्हाळे यांच्या खेळण्याच्या बागडण्याच्या वयाततच वडील वारले. आई प्लेगने दमलेली. प्लेगजाताच सर्व घरी आले. या प्लेग मध्ये वडील वारले. आई, बहिन व भाऊ यांच्यावर आलेले संकट टळलेले. ते संकट गेले पण संकटात वडीलांच्या विधी साठी सुद्धा कोण आले नाही ही वेदना हे कुटूंब विसरले नाही. थोरले म्हणून वावरताना सर्वांना घेऊन ते वाटचाल करीत होते. ढासळलेला व्यापार ते सावरत होते. आशा वेळी ते 1905 चा पुन्हा प्लेगचा वारू पुण्याला कवेत घैऊ लागला सर्वजन राहुरीला गेले. पण या राहुरीत कोणीच आसरा दिला नाही ते नगरला आले. याच काळात या प्लेगच्या वावटळीत एक बंधु वारले. याच काळात जगण्याची साधने संपली रामचंद्र शेठ यांनी कमवलेली घरे सावकारांनी गिळून टाकली. पुण्यात रहावयास घर ही नव्हते. अशा शुन्यातुन पन्हाळे कुटूंब हे राखेतून पुन्हा उभे राहिले व आपले गत वैभव मिळवू लागले.
कै. किसन रामचंद्र पन्हाळे यांना तिन मुले व चार मुली. त्यातील एक डिग्रज येथील माधवराव पाटील यांना दिली होती. माधवराव पाटील विदर्भातील मोठी असामी होते. ते आमदार व तैलिक महासभेचे प्रमुख होते. व्यंकटराव मधुकर व अमृतराव ही मुले. पण कै. व्यंकटरराव व मधुकर हे अकाली गेले. राहीले अमृतराव यांनी लहान पणा पासुन आपल्या व्यवसायात लक्ष दिले. अनेक वेळा त्यांच्या हुशारी व प्रयेत्नाची कसोटी लागे. परंतु पन्हाळे घराण्याने जे सुरूवातीस सोसले त्यांमुळे त्यांना बरेच संस्कार कै. किसनराव पन्हाळे यांनी वडीलकीच्या नात्याने दिले होते. घरातील कर्ती मंडळी दमली व आपला प्रवास संपला तेंव्हा सर्व जबाबदारी कै. अमृतशेठ यांच्यावर आली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. व्यवसायाचे गणीत बदलेले होते. त्यांनी आपला शासकीय ठेकेदाराचा गव्हर्मंटशी संबंधीत व्यवसाय गतीशील ठेवला. आज ही फक्त पुण्यात नव्हे तर राज्यभर जे प्रशासकीय फर्नीचर रूबाबात उभे आहे. ते यांच्याच नजरेतुन तयार झालेले आहे. काळाला अनुरूप त्यांनी आपले वडिल किसन रामचंद्र असोसीएट ही नवी फर्म उभी केली. या फर्मच्या उभारणीत अतोनात कष्ट ही उभारलेले आहेत. याच मुळे आज सुद्धा किसनराव रामचंद्र असोसीएट या फर्मला मान बिंदू आहे. हे सहज शक्य नाही परंतू कै. अमृतशेठ पन्हाळे यांनी शक्य केले आहे. पन्हाळे यांनी पुण्यात पाऊल टाकल्या पासुन सुरू झालेली ही पन्हाळे कुटूंबाची वाटचाल त्यांनी यशस्वी पणे संभाळलेली व त्यात भरच टाकली.
कै. अमृतशेठ पन्हाळे यांना सर्वजन नाना म्हणत मी तेली आहे याचा यांना आभीमान होता. समाजाच्या चांगल्या उपक्रमांना ते सोबत देत. आपला त्यागाचा सहभाग ठेवत. कै. रामचंद्र शेठ पन्हाळे यांनी पुण्यात आल्या नंतर पुण्याच्या मंगळवार पेठेतील खडीच्या मैदाना जवळील श्री. नागेश्वर मंदिर हे श्रद्धा स्थान मानले. कुटूंबावरील आलेल्या अनेक संकटांना सामना देताना एक चेतना मिळते ही श्रद्धा ठेवली कै. अमृतशेठ यांना जेंव्हा समज येऊ लागली त्या दिवसा पासुन ते प्रथम चालत नंतर सायकलवर जाऊन नागेश्वराला दुध देत असत. व्यवसायात गुंतल्या नंतर ही त्यांनी ही सेवा अखंड ठेवली. जेंव्हा ते बाहेरगावी असत तेंव्हाच फक्त कामगार दुध घेऊन जातो का नाही हे ही पहात. कै. अमृतशेठ यांनी किसन रामचंद्र ही फर्म उभी करून नावा रूपास आणलेली आहे. कै. अमृतशेठ ही जसे भक्ती करीत ते तसे अभ्यासू होते. अनेक विषयावरील लेखकांची पुस्तके संग्रही होती. त्यांचे ते वाचन करून आपल्या ज्ञानात भरच घालत असते. त्यांनी आपल्या पन्हाळे घराण्याची यशस्वी पणाचे संस्कार त्यांचे चिरंजीव श्री. शिरीष यांना दिलेत. त्यांना जाऊन एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यांचे आठवण सात्याने होत आसंत. परंतू त्यांनी दिलेल्या संस्काराचा विचाराचा वसा घेऊन श्री. शिरीष शेठ यशस्वी पणे चालवत आहेत.
कै. अमृतशेठ किसन पन्हाळे यांना प्रथम स्मृती दिना निमित्त पन्हाळे परिववार व समाज बांधवा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.