पुणे :- मला एक समाधान वाटते तेली गल्ली (गावकुस) मासीकाची किमान तिस वर्षाची एक साक्षीदार खिशात पैसा नाही. पण जवळ फक्त जिद्द पुण्यातील जुने बंगले, जुने वाडी पायी चालुन मासिक सुरू केले. सहकार्याचा हात मिळाले अंक सुरू राहिला हि सर्व तारेवरची कसरत. तेंव्हा मी रावसाहेबांची नात सुन त्यांच्या बंगल्यात होते. चांगल्या बाबतीत सहकार्य करावे ही पन्हाळे घराण्याची परंपरा मला सुंस्कार करून गेलेला. मला सहकार्य मागीतले ते मी दिली ही आगदी अंक सुरळीत सुरू होई पर्यंत . मी माझ्या व्यापात गुंतले. संपर्क कमी झाला परंतु तिस वर्षा पासुन माझ्या सहर्काची जाणीव आजपर्यंत ठेवली. याचे मला अश्चर्य ही वाटले. तेली गल्लीने गत ३३ वर्षात हाच विश्वास संपन्न केला आहे.
नव वर्षाच्या स्वागताला समोरे जाताना तेली गल्ली मासिका समोर आले. मला अंक पहाताच अश्चर्य ही वाटले चार पानाचे सुरू केलली वाट आज कुठल्या कुठे गेली आहे. सुबक छापाई व वर्गणीदारांना फक्त १०० रूपयात घरपोच देणे हे आजच्या महागाई काळात शक्य नाही पण ही अशक्य गोष्ट शक्य केली जाते. आज किमान १० लाख रूपये एका मेळाव्यात खर्च होतात. परंतु वधुवरांची कोणतीच फी न घेता त्यांना प्रसिद्धी देणे ही त्यागी मनोवृत्ती गेली ३३ वर्ष समाजा समोर आली आहे. त्यांच्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा