लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (3) लिंगायत हिंदू नाहीत, लिंगायत वीरशैव नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्मिय आहेत.
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली.
वैदिक हिंदू धर्माचे संस्कार आणि बसवादी शरणांच्या लिंगायत धर्माचे संस्कार, नियम पुर्णतः एकमेकांपासून वेगळे आहेत. वीरशैव आणि हिंदू पंचसुतक, वर्णव्यवस्था मानतात. लिंगायत पंचसुतक,वर्णव्यवस्था मानत नाहीत. लिंगायतानी एकेश्वरवाद जपला आहे याउलट वीरशैव किंवा हिंदूंनी बहुदेवतावाद जोपासला आहे. हिंदूचे व्रत-वैकल्य, उपवास, सण-समारंभ लिंगायतानी अमान्य केले आहे. लिंगायत वेद , पुराण, पंचांग, वास्तुशास्त्र किंवा कोणतेही शास्त्र मानत नाहीत. हिंदू किंवा वीरशैव हे सर्व मानतात. वीरशैव धर्म आहे असे कागदपत्री सिद्ध होत नाही, याउलट तो धर्म नसून मत आहे असे अर्थाचे सिद्धांतशिखमणी ग्रंथात श्लोक आहेत. वीरशैव ही हिंदू धर्माची एक शाखा आहे, यावरून वीरशैव आणि लिंगायत एकच नाही. दोन्ही वेगळे धर्म आहेत. लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे. अधिक अभ्यासासाठी लिंगायत हिंदू नाहीत आणि लिंगायत वीरशैव नाहीत
ही दोन प. पु. माते महादेवींची पुस्तके वाचावी. १८५१ ते १९ ४१ च्या जनगणेत लिंगायत नावाने स्वतंत्र धर्माची नोंद आहे , ते अवश्य पाहावे. कन्नड शरण साहित्य वचनातुन लिंगायत, लिंगवंत, लिंगागी या शब्दाचा वापर करून लिंगायत तत्वज्ञान सांगितले आहे. वचनग्रंथ मराठीत उपलब्ध आहेत तीही वाचावी.
संदर्भ
डॉ. एम एम कलबर्गी लिखित पंचाचार्यांचे असली रूप वीरशैव इतिहास आणि भूगोल सिद्धांतशिखमणीचे असंबद्ध सिद्धांत सर्व कल्याणक्रांती मासिक