लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (4) लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली.
लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे.लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे. लिंगायत हा महाशरणांच्या आणि महाशरणीच्या वचनांद्वारे विश्वचैतन्याच्या निर्धाराचा एक बसवयोग आहे. लिंगायत हे कायकाकवे कैलास या स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे एक अर्थशास्त्र आहे. लिंगायत हे सदाचाराला स्वर्ग मानणारे एक नीतिशास्त्र आहे. लिंगायत ही दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती आहे. लिंगायत ही दयेलाच धर्म मानणारी एक मानवतावादी शिकवण आहे. लिंगायत हे स्वतंत्र , समता, बंधुता, सामाजिक न्याय व गौरव जोपासणारे एक न्यायशास्त्र आहे. लिंगायत हे स्त्री गौरवाचे व स्रीजगताच्या उद्धाराचे एक वैशिष्टयपूर्ण सूत्र आहे. लिंगायत वेदाला नव्हे तर, अनुभवाला प्रमाण मानणारा एक सिद्धांत आहे. लिंगायत एक विवेकवादी व वास्तववादी जीवनविषयक दृष्टिकोन आहे. लिंगायत हा संपूर्ण शाकाहारी सात्विक आणि समृद्ध जीवनपद्धती आहे. लिंगायत हा अवघ्या इष्टलिंगालाच आपले सर्वस्व मानणारा धर्म आहे. लिंगायत हा बसवेश्वरप्रणित इष्टलिंगधारणा स्वरूपातील एकेश्वरवादी शिवपासक धर्म आहे. लिंगायत निवृत्तीवादी नाही तर आशावादी आणि प्रवृत्तीवादी धर्म आहे. लिंगायत हस्तरेषेला महत्व न देता मनगटाच्या शकतील महत्व देणारा धरण आहे. लिंगायत हा मरणवे महानवमी म्हणजे मृत्यूला मोठा सण मानणारा धर्म आहे. लिंगायत हा एकूणच सुतकप्रथा मान्य नसणारा विज्ञानवादी धर्म आहे.
भारताच्या लोकसंख्येच्या केवळ १ कोटी लिंगायत आहेत. त्यामुळे लिंगायत धर्माला अल्पसंख्याक मान्यता मिळावी , यासाठी चळवळ सक्रिय झाली आहे.
आण्णा बसवण्णांची लिंगायत धर्म चळवळ ही जातीवर आधारित नाही, विचारावर आधारित आहे. लिंगायत धर्मात जातीला नाही तर विचाराना महत्व आहे.
*बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात, " लिंगधारक भक्त घरी आल्यास त्याला त्याचा धंदा विचारल्यास आपली शपथ , शरणांची शपथ, तुटून पडो हे शीर, कुडलसंगमदेवा.*
*व्यवसायावरून जाती पडल्या आहेत, बसवादी शरणांची चळवळ ही जातीयता, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, पुरोहितशाही, कर्मकांड यांच्या विरोधात आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.*
बसवण्णांनी वेगवेगळ्या १८ पगड जातीतुन, १२ बलुतेदारातुन सर्व लोक एकत्र करून लिंगायत नावाची चळवळ उभी केली तीच पुढे जाऊन लिंगायत धर्म नावाने ओळखली गेली.* *लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे, ते हिंदू नाहीत ते फक्त लिंगायत आहेत.* आज काही जाती लिंगायत धर्मातून नामशेष झाल्या आहेत पण १२ व्या शतकापासून या जाती लिंगायत धर्मात आहेत. आजचे ओ. बी. सी., व्ही.जे.एन.टी., एस. बी. सी., ओपन मधील वाणी, शीलवंत, दिक्षावंत या जाती लिंगायत धर्मात आहेत. *पोटजाती सोडा, लिंगायत जोडा. अल्पसंख्याक धर्म मान्यतेच्या लढ्यात सक्रिय सहभाग घ्या.* कर्नाटकात या सर्व जाती लिंग धारण करतात. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या जातीतून लिंगायत चळवळीत सहभागी शरणांची जात आणि नावे देत आहे.
वाद्य वाजविणारे (नटवू जातीचे) - अल्लमप्रभु
केंभावी भोगण्णा.- ब्राम्हण
मातंग- चेन्नय्या.
ढोर- ककय्या.
कुंभार- गुंडय्या
कोष्टी- शंकरदासिमय्या.
विणकर कोष्टी- दासिमय्या-दुग्गळे
परीट-मडिवाळ माचय्या
किन्नरी ब्रम्हय्या
बुरुड केतय्या
धनगर- वीर गोल्लाळ
काश्मीरचा राजा- मोळीगे मारय्या महादेवी
दोरे विणणारे (मांग)- चंदय्या
कोष्टी- देवय्या रायम्मा.
तांदूळ वाचणारे- लक्कम्मा मारय्या.
न्हावी- हडपद अप्पण्णा-लिंगम्मा.
ब्राम्हण -मंचण्णा- रायम्मा.
चांभार- हरळय्या-कल्याणीम्मा
रस्ता झाडणारी- सत्यक्का.
वेश्या- सुळे संकव्वे.
वैद्य - संगण्णा.
नावाडी- अंबिगर चौडय्या.
गवळी- तुरुंगाहि रामण्णा.
दारू विकणारा- हेडद मारय्या.( व्यसनमुक्तीचा संदेश दिला, पुर्वधर्माचे व्यवसाय सोडले)
गुराखी- गोरक्ष
चोरी करणारा-उरलिंगपेद्दी.(पुर्वधर्माचे व्यवसाय सोडले, मठाचे मठाधिश झाले, जंगमत्व स्वीकारले)
मन्मथ स्वामी - जंगम.
संदर्भ
डॉ. सुर्यकांत घुगरे यांचे पेठवडगाव येथे संपन्न झालेल्या दहाव्या शरद संस्कृती अध्ययन शिबिरातील अध्यक्षीय समालोचन
वचन सिद्धांत सार
वचन (बसव समिती)
शरदण जीवन दर्शन - राजू जुबरे
म. बसवेश्वर आणि समकालीन शरण