लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (5) अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली.
लिंगायत धर्म अल्पसंख्याक दर्जा मिळेल. लिंगायत धर्म अल्पसंख्याक शाळा काढण्याचा अधिकार मिळेल. तंत्र व व्यवसाय शिक्षणसाठी कमी व्याजदरात शासनाकडून कर्ज मिळेल. कलम २९ व ३० नुसार धर्म, लिपी, भाषा, संस्कृती याचे जतन केले जाईल. धार्मिक स्थळे, बसवकल्याण, कुडलसंगम, आळते, बसवन बागेवाडी या स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मिळेल. लिंगायत संस्कृती आणि शरणांच्या स्थळांचे रक्षण केले जाईल. लिंगायत विद्यार्थी विध्यार्थीनिंना स्वतंत्र वसतिगृह मिळतील. संस्थांना धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले दान करमुक्त असेल. धर्मपालन आणि धर्मप्रसाराचा मूलभूत हक्क प्राप्त होईल. स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क,( शाळा, महाविद्यालय, व्यवसायशिक्षण, प्रशिक्षण, कृषी, औद्योगिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय यांना अनुदान मिळून आशा महाविद्यालयात लिंगायत धर्मासाठी ५० % जागा राखीव राहील. बेरोजगार तरुणांना विशेष अर्थसहाय्य मिळेल. ५ वी ते ७ वि वर्गात विद्यार्थीना उपस्थित राहिल्याबद्दल २ रु प्रोत्साहन भत्ता मिळेल. अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत आणि दहावीनंतर उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल. आयटीआय शिक्षणसंस्थेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना जागा राखीव ठेवण्यात येतात. अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे स्वतंत्र योजना राबविल्या जातील. प्रधानमंत्री २० कलमी योजनांद्वारे अल्पसंख्याक असलेल्यांना भरपूर सुविधा मिळतील. महाराष्ट्र शासनाची अल्पसंख्याक संचालनालयाची निर्मिती व याद्वारे अल्पसंख्याक समाजाचा विकास.
(लेखक: प्रा आनंद कर्णे, नांदेड.(बसवदर्शिकेतून )
संकलन : अभिषेक देशमाने.)
*या लेखाचे संदर्भग्रंथ:*
प्रा.आनंद कर्णे , नांदेड, याचा लेख बसवदर्शिका दिनदर्शिका
*लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली.*
९८२२०५४२९१.