तेली समाज महासंघ म्हणजे एक चळवळ आहे. तेली समाजाच्या सर्व नागरिकांची ही एक शीर्षस्थ संस्था आहे. शिक्षणाचे प्रश्न, नागरीकरणाचे प्रश्न आणि तेली समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंंत पोहोचविणे आणि न्याय मिळविण्यासाठी धडपडणे हे महासंघाचे कार्य आहे. तेली समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी आणि समाजाची बांधणी करण्यासाठी हे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक आजही संघटित नाहीत. त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष मधुकरराव वाघमारे सातत्याने भ्रमण करीत असतात. महासंघाने या संपर्कातून मोठी चळवळ उभी केली आहे. समाजाच्या प्रबोधनाचे हे कार्य सुरू आहे.