नागपुर सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. विवाहात प्रचंड खर्च होतो, त्यामुळे पालक हवालदिल होतात. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांची आयुष्यभराची पुंजी मुलांच्या विवाहात संपून जाते. यावर तोडगा काढण्यासाठी संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सामूहिक विवाहाची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या साह्याने तयार करण्यात आली. या माध्यमातून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष रामूजी वानखेडे आणि सचिव पुरुषोत्तम घाटोळे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंंत हजारो जोडप्यांचे विवाह झाले आहेत.