लोकांच्या घर बांधण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही संस्था कार्य करते. स्वत:चे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जागा मिळविण्यापासून घर बांधेपर्यंंत मोठे सोपस्कार असतात. त्यात अर्थसहाय्य असल्याशिवाय काहीच करता येत नाही. घरासाठी अर्थसहाय्य करणे, भूखंड योग्य किमतीत उपलब्ध करून तेथे नागरी सोई निर्माण करण्याचे कार्य संस्थेने केले आहे. यामुळे अनेक बांधवांना स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले. याशिवाय कौटुंबिक गरजांसाठीही ऋण कमी व्याजदरावर उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असून, संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिनकर कुंभलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. संस्थेचे सचिव विनोद टिकले यांचे महत्त्वाचे सहकार्य त्यात लाभते आहे.